महाराष्ट्राचा बडा प्रकल्प गेला गुजरातमध्ये.? आदित्य ठाकरेंची भाजपवर सडकून टीका...

प्रतिनिधी - विशाल पाटील

मुंबई : महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला नेत असल्याचा आरोप विरोधकांकडून तर कधी सामान्य जनतेकडून अनेकदा भाजपवर केला जातो.! परंतु आता माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी ट्विट करुन; एक मोठी माहिती समोर आणली असून, महाराष्ट्रातील पुण्यात येणारा मोठा प्रोजेक्ट गुजरातला गेला असल्याचे त्यांनी म्हंटले आहे.

ट्विटरद्वारे आदित्य ठाकरे म्हणाले की, "ज्या प्रकल्पासाठी आम्ही सरकारमध्ये असताना खूप प्रयत्न केले, तो फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला जातोय आणि त्यासाठी काही मंडळींनी प्रयत्न केले".! असा आरोप करत आदित्य ठाकरे यांनी अप्रत्यक्षरित्या भाजप आणि शिंदे सरकारवर टीका केली आहे.

1.54 लाख कोटी रुपयांच्या प्रचंड गुंतवणुकीसह महाराष्ट्रात प्रस्तावित असलेला महत्त्वाकांक्षी वेदांत-फॉक्सकॉन सेमीकंडक्टर प्लांट गुजरातला गेला असून, यासह राज्यातील 1 लाख तरुणांचा रोजगार'ही (नौकरी) राज्याबाहेर गेला आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारला हा मोठा धक्का मानला जात आहे.

वेदांत समूहाचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांनी ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. अग्रवाल यांनी ट्विट केले की, वेदांत-फॉक्सकॉन सेमीकंडक्टर प्लांट गुजरातमध्ये उभारण्यात येणार आहे. या प्लांटच्या माध्यमातून वेदांत समूह गुजरातमध्ये 1.54 लाख कोटी रुपयांची ऐतिहासिक गुंतवणूक करणार आहे. त्यामुळे आत्मनिर्भर सिलिकॉन व्हॅली बनण्याचे भारताचे स्वप्न सत्यात उतरणार आहे. उद्योगपती अनिल अग्रवाल यांनी सांगितले की, या प्लांटच्या स्थापनेमुळे भारताची प्रतिमा सेमीकंडक्टर चिप टेकर ते चिप मेकर अशी बदलेल. या प्लांटमधून थेट एक लाख कुशल रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत. गुजरातमध्ये निर्माण होणाऱ्या या नवीन इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन केंद्राचा फायदा देशातील सर्व राज्यांना होणार आहे.

https://twitter.com/AUThackeray/status/1569618023954223105?s=20&t=nBC_xPRCNfgmKB55sHDNKA