शीतल म्हात्रेंना राष्ट्रवादीचा इशारा.! फोटो डिलीट करता की कारवाई करु?
![शीतल म्हात्रेंना राष्ट्रवादीचा इशारा.! फोटो डिलीट करता की कारवाई करु?](https://news15marathi.com/uploads/images/202210/image_750x_63380655cc6f1.jpg)
प्रतिनिधी - मुंबई
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या खुर्चीवर बसून त्यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे हे कारभार करत असल्याचा आरोप; राष्ट्रवादीकडून करण्यात आला होता. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी त्यासंबंधी फोटो देखील शेअर केले होते. त्यानंतर आता शिंदे गटातील शितल म्हात्रें यांनी त्याच्या ट्विटर अकाऊंटवरुन खासदार सुप्रिया सुळे यांचा एक फोटो ट्विट करत; राष्ट्रवादीला प्रश्न केला आहे. तर या फोटोमध्ये सुप्रिया सुळे यांच्या मागे मुख्यमंत्र्यांचा बोर्ड दिसत आहे.
परंतु; यावर आता राज्यातलं राजकारण चांगलचं तापलं असून, हा फोटो बनावट असल्याचा दावा राष्ट्रवादीकडून करण्यात आला आहे. तसेच या प्रकरणावरुन राष्ट्रवादीच्या वतीने शीतल म्हात्रे यांच्याविरोधात तक्रार देखील दाखल करण्यात आली आहे. असा फोटो ट्विट केल्याबद्दल शीतल म्हात्रे यांनी सुप्रिया सुळे यांची माफी मागावी नाहीतर; आम्ही कायदेशीर कारवाई करु.! असा पवित्रा राष्ट्रवादीने घेतला आहे.
तर श्रीकांत शिंदे हे मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत बसल्याचा दावा राष्ट्रवादीने केला होता. यावरून वाद निर्माण झाल्यानं श्रीकांत शिंदे यांनी त्याबाबत स्पष्टीकरण देखील दिलं होतं. हे आपल्या घरातलं कार्यालय आहे, असं स्पष्टीकरण देताना श्रीकांत शिंदे म्हणाले, "हे सगळं हास्यास्पद आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सक्षम आहेत.१८ - २० तास काम करतात, कोणालाही त्यांचा कारभार सांभाळण्याची गरज नाही. फोटोमधलं कार्यालय घरातलं आहे. मी आणि शिंदे साहेब दोघेही याचा वापर करतो.