दिव्यांग सेवा समिती राज्य अध्यक्षपदी सुखदेव खुर्दळ यांची नियुक्ती
![दिव्यांग सेवा समिती राज्य अध्यक्षपदी सुखदेव खुर्दळ यांची नियुक्ती](https://news15marathi.com/uploads/images/202401/image_750x_65b6382c53062.jpg)
NEWS15 मराठी प्रतिनिधी - बापू चव्हाणम नाशिक
राष्ट्रीय पुरोगामी पञकार संघ संचलित दिव्यांग सेवा समितीच्या महाराष्ट्र राज्य अध्यक्षपदी सुकदेव खुर्दळ यांची नुकतीच राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष विजय सुर्यवंशी यांच्या उपस्थितीत; राज्य अध्यक्ष संतोष जाधव यांच्या हस्ते नियुक्ती पञ देवून नियुक्ती करण्यात आली आहे.
नाशिक जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी व न्याय व हक्कासाठी सदैव तत्पर असलेले सुकदेव खुर्दळ यांच्या कार्याची दखल घेत, राष्ट्रीय पुरोगामी पञकार संघ संचलित दिव्यांग सेवा समितीच्या महाराष्ट्र राज्य अध्यक्षपदाची जबाबदारी देत संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष विजय सुर्यवंशी, राज्य सचिव बाळासाहेब आडंगळे यांच्या उपस्थितीत सुकदेव खुर्दळ यांची निवड करण्यात आली असून, संघाचे राज्यअध्यक्ष संतोष जाधव यांच्या हस्ते नियुक्ती पञ देवून गौरवण्यात आले. यावेळी व्यासपीठावर राज्य संपर्क प्रमुख रफिक सैय्यद राज्य, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर बागूल, उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष बाळासाहेब अस्वले, अन्याय अत्याचार निवारण कमेटी राज्य अध्यक्षा कल्याणीताई धोडगे, पोलिस मिञ समिती राज्य अध्यक्ष आनंद दाणी, वैद्यकीय सेवा समिती राज्यअध्यक्ष डॉ.राहूल सोनवणे, बागलाण तालूका अध्यक्ष भगवान पवार, तालूका कार्यध्यक्ष भगवान पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
सुकदेव खुर्दळ यांच्या निवडी बद्दल केंद्रीय आरोग्य मंञी ना डॉ भारतीताई पवार, विधानसभा उपाध्यक्ष ना. नरहरी झिरवाळ, मा.आमदार रामदास चारोस्कर, मा.आमदार धनराज महाले, कादवा सहकारी साखर कारखाना चेअरमन श्रीराम शेटे, सहकार नेते सुरेश डोखळे, कृषी उत्पन्न बाजार समिती मा. चेअरमन दत्तात्रेय पाटील, पोलिस पाटील संघटनेचे प्रदेश अध्यक्ष चिंतामण मोरे, मा. तालूका अध्यक्ष सोमनाथ मुळाणे, दिंङोरी नगरपंचायत नगरसेवक शैला उफाङे, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक दत्तात्रेय भेरे, दिंङोरी पंचायत समिती मा. उपसभापती भास्कर भगरे, मा. सरपंच ज्योती देशमुख, अवनखेड सरपंच नरेंद्र जाधव, म्हेळूस्के उपसरपंच योगेश बर्डे, अक्राळे उपसरपंच संदीप केंदळे, शेतकरी सहकारी संस्था संचालक संतोष कथार, भगवान गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते बापू चव्हाण, गायकवाड, खतवड ग्रामपंचायत सरपंच बबन दोबाडे, सदस्य मंडळ आदीनी अभिनंदन केले आहे.