मोठी बातमी : खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सयाजी मोहिते यांना धक्का..!

मोठी बातमी : खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सयाजी मोहिते यांना धक्का..!

News15 मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील 

राजगुरूनगर : खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे हमाल / मापाडी संवर्गातून संचालक असलेले सयाजी माणिक मोहिते यांचे सहाय्यक निबंधक खेड यांनी सर्व बाजूची पडताळणी करून त्यांचे हमाल परवाना रद्द पातल ठरवला आहे. त्यामुळे सयाजी मोहिते यांचे संचालक पद धोक्यात आल्याची चर्चा तालुक्यात रंगू लागली आहे.

सहाय्यक निबंधक सहकारी संस्था खेड यांच्याकडून सर्व बाजूची पडताळणी करून सयाजी मोहिते यांचा हमाल परवाना रद्द करण्यात आल्याचा आदेश पारित करण्यात आला आहे. त्यामुळे कुठे तरी पुन्हा एकदा खेड कृषी उत्पन्न बाजार समिती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मागील काही दिवसापूर्वी सत्ताधारी गोटात सहभागी झालेले अशोक राक्षे यांच्या संचालक पदाला विरोधी गटाने आव्हान दिले होते. त्यांनी उच्च न्यायालयात आव्हान देऊन स्थगिती मिळवली होती. त्यानंतर आता पुन्हा सयाजी मोहिते यांच्या पदावर आता गंडातर येणार कि? ते पुन्हा वरिष्ठ कार्यालयाकडे दाद मागणार कि, उच्च न्यायालयात सहाय्यक निबंधक यांच्या आदेशाला आव्हान देणार हेच पहावे लागेल.