भाजप आमदार नितेश राणेंची भर सभेत पोलिसांना धमकी? पोलिसांनो मस्ती कराल तर... मी डायरेक्ट कार्यक्रम करतो...

भाजप आमदार नितेश राणेंची भर सभेत पोलिसांना धमकी? पोलिसांनो मस्ती कराल तर... मी डायरेक्ट कार्यक्रम करतो...

NEWS15 मराठी रिपोर्ट - सांगली

उरण आणि धारावी हत्याप्रकरणी पीडितांना न्याय मिळावा आणि दोषींना शिक्षा व्हावी यासाठी सांगलीमध्ये; भाजपचे खासदार अमर साबळे आणि आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शिवशक्ती-भीमशक्ती जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता.

या दरम्यान आयोजित सभेतून बोलताना नितेश राणेंनी पोलिसांवर निशाणा साधला आहे.

पोलिस ठाण्यात लव्ह जिहाद बाबत तक्रार देण्यात येणाऱ्या मुलीची तक्रार अर्ध्या तासात घेतली पाहिजे, अन्यथा पुढच्या तीन तासात पोलिस ठाण्यात दाखल होऊन धिंगाणा घालू असा इशारा नितेश राणे यांनी दिला आहे. तसेच पोलिसांना धमकी दिल्याचे समोर आले आहे.

लव्ह जिहाद वर बोलताना भाजपचे आमदार नितेश राणे यांनी सांगलीमध्ये पोलीस अधिकाऱ्यांना भर सभेतून दम भरला. सरकार हिंदूचे आहे, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. तुम्हाला जर तुमच्या पोस्टवर मजा येत नसेल तर अशी काही मस्ती करा, मग तुम्हाला अशा जिल्ह्यात घेऊन जाऊ की जिथून बायको फोनपण लागणार नाही अशा भाषेत नितेश राणेंनी पोलिसांना दम दिला.  मी काही निवेदन वगैरे देत बसत नाही, ती भाषा मला जमत पण नाही. मी डायरेक्ट कार्यक्रम करतो. 

या आधी आमदार नितेश राणे यांनी पोलिसांवर वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. पोलिस काय करणार आहेत, हे फक्त आमचे व्हिडीओ काढतील आणि घरात जाऊन बायकोला दाखवतील असं ते म्हणाले होते. तसेच आमचा बॉस सागर बंगल्यावर बसतो असंही ते म्हणाले होते. आणि त्यांतर पोलीस पत्नींनी चांगलाच समाचार घेतला होता. त्यानंतर पुन्हा असं वक्तव्य केल्याने, पुन्हा राजकारण तापण्याची शक्यता आहे.