त्याने वाजवली पीडितेच्या घराची कडी, त्याच्या हातात पडली पोलिसांची बेडी...!
![त्याने वाजवली पीडितेच्या घराची कडी, त्याच्या हातात पडली पोलिसांची बेडी...!](https://news15marathi.com/uploads/images/202302/image_750x_63ef504e6c643.jpg)
News15 मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील
चाकण : महाळुंगे इंगळे गावातील एका २० वर्षीय महिलेचा पाठलाग करून तिच्या घराची कडी वाजवून तिला अर्वाच्य व अश्लील भाषेत शिवीगाळ केल्या प्रकरणी चार व्यक्तीवर महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडितीने दिलेल्या फिर्यादीवरून फिर्यादी कंपनीतून ड्युटी संपवून रूमवर पायी जात असताना एक काळ्या रंगाची फोरव्हीलर गाडी नंबर एम एच ०५ ए जे ७४१७ मध्ये विकास सरवदे(वय-२५ वर्षे), रा. चिखली ता. हवेली, जि. पुणे व त्याचे तीन साथीदार मित्र यांनी पीडितेचा पाठलाग करत असल्याचे पीडितेच्या लक्षात आले. तेव्हा पीडित महिला हिने स्वतःचा जीव वाचविण्यासाठी घाबरून पळत रूम वरती चालत आली व रूमचा दरवाजा बंद करून रूम मध्ये बसली. त्यानंतर आरोपी विकास सरवदे याने माझ्या रूमचा दरवाजा जोर जोरात वाजविण्यास सुरुवात केली. यावर पीडितेने कोण आहे असे विचारले असता त्याने विकास सरवदे नाव सांगितले. त्यावर आरोपीने मला तुझ्याशी बोलायचे आहे असे बोलताच. पीडितेने तू इथून निघून जा असे सांगितले.
त्यावर आरोपी विकास यांने पीडितेच्या रूमचा दरवाजा जोर जोरात वाजविण्यास सुरुवात केली. तसेच पीडितेचा अर्वाच्य व अश्लील भाषेत शिवीगाळ करून बळजबरीने घरात घुसण्याचा प्रयत्न केला. यावर पीडित महिलेने प्रसगावधान राखून महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस लोखंडे यांना फोन करून घटनेच्या बाबत कळवले असता. लोखंडे यांनी तातडीने घटनास्थळी जाऊन विकास सरवदे व त्याचे सोबत चारचाकी गाडीत असणारे राजेश रामदास पाटोळे(व-२८ वर्षे ), ज्ञानेश्वर बाबुराव वैरागे(वय -३६ वर्षे), आकाश मोकिंद कांबळे(वय-२३ वर्षे) यांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात हजर केले.
आरोपिंवर महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात भा. द. वि. कलम ३५४(ड), ५०४, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय जाधव हे करत आहेत.