कादवाचा गुरुवारी 2 रोजी गळीत हंगाम शुभारंभ, सभासद ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन....!

कादवाचा गुरुवारी 2 रोजी गळीत हंगाम शुभारंभ, सभासद ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन....!

News15 मराठी प्रतिनिधी बापु चव्हाण 

दिंडोरी : कादवा सहकारी साखर कारखान्याचे ४७ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ व श्रीराम शेटे संकुल (व्यापारी गाळे) उद्घाटन सोहळा गुरुवार दि.२ नोव्हेंबर २०२३ रोजी सकाळी दहा वाजता ज्येष्ठ सभासद बाकेराव जाधव, दौलतराव उखर्डे, दौलतराव भालेराव, उध्दव मोरे, संजय पडोळ यांचे हस्ते होणार आहे.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी श्रीराम शेटे राहणार आहेत.

यावेळी गव्हाण पूजा सौ.व रमेश देशमुख(लखमापूर),सौ.व प्रकाश देशमुख(करंजवन),सौ.व बाळासाहेब धुमने (मडकीजांब), सौ.व वामन बेझेकर(पिंपळगाव धूम),सौ.व दत्तू कड (जोरन), सौ.व वसंतराव उफाडे(वरखेडा), सौ.व जितेंद्र दिघे (परमोरी), सौ.व संजय घडवजे (तीसगाव), सौ.व किरण देशमुख(खेडले), सौ.व रावसाहेब मोरे (जालखेड), सौ.व बाबाजी पगार (खडक ओझर)यांचे हस्ते होणार आहे.

सर्व सभासद ऊस उत्पादक यांनी कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन व्हाईस चेअरमन शिवाजीराव बस्ते, सर्व संचालक व प्रभारी कार्यकारी संचालक विजय खालकर यांनी केले आहे.