भैरवनाथ विविध कार्यकारी सेवा सोसायटी खराबवाडीच्या चेअरमन पदी तानाजी ज्ञानेश्वर खराबी यांची बिनविरोध निवड...!

News15 मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील

चाकण : खेड तालुक्यातील राजकीय दृष्ट्या प्रतिष्टेची समजली जाणाऱ्या खराबवाडी गावच्या भैरवनाथ विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या चेअरमन पदी तानाजी ज्ञानेश्वर खराबी यांची बिनविरोध निवड झाली आहे. तानाजीशेठ खराबी हे अतिशय सय्यमी व प्रामाणिक व्यक्तिमत्व म्हणून खराबवाडी गावात व पंचक्रोशीत परिचित आहेत. त्यामुळे खेड तालुक्यात नावाजलेल्या खराबवाडी गावचा सोसायटीचा कारभार ते पारदर्शी चालवतील यात कोणती शंका नाही.

याच निवडणूक प्रक्रियेसाठी निवडणूक अधिकारी म्हणून मुलाणी यांनी काम पाहिले तर त्यांना सोसायटीचे सचिव रोहिदास गव्हाणे यांनी सहकार्य केले. यावेळी सोसायटीचे सर्व विद्यमान संचालक मंडळ यांच्यासह गावचे माजी उपसरपंच प्रकाश खराबी, राष्ट्रवादी काँग्रेसचे खेड तालुका खजिनदार अरुण सोमवंशी, किरण कड, किरण खराबी, मंगेश कड, सचिन कड, मनसे नेते मनोज खराबी, विठ्ठल कड, अमोल कड, नवनाथ कड, शिवाजी खराबी, माणिक खराबी, दत्ता साठे आदी. ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.