महाराष्ट्र दिनी.! आदर्श तलाठी पुरस्कार यु. एस. वाघधरे यांना प्रदान...
![महाराष्ट्र दिनी.! आदर्श तलाठी पुरस्कार यु. एस. वाघधरे यांना प्रदान...](https://news15marathi.com/uploads/images/202305/image_750x_644fa53b8a474.jpg)
NEWS15 प्रतिनिधी : सुधीर शिवणकर
सड अर्जुनी : १ मे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून, गोंदिया येथील कारंजा पोलीस मुख्यालयाच्या पटांगणावर आयोजित मुख्य शासकीय ध्वजावंदनाचा कार्यक्रमाप्रसंगी.! सडक अर्जुनी तालुक्यातील सौंदडचे तलाठी उमराव एस .वाघधरे यांचा आदर्श तलाठी पुरस्कार देऊन, जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, निवासी उपजिल्हाधिकारी बेलपात्रे मॅडम, अप्पर जिल्हा कोषाधिकारी बाविस्कर, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजन चौबे, संजय धार्मिक, अधीक्षक व इतर मान्यवर अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
सौंदड'ला दुसऱ्यांदा आदर्श तलाठी पुरस्काराचा मान...
तालुक्यातील सौंदड गाव सर्वात मोठे गाव आहे. या गावात तलाठी म्हणून कार्यरत डब्ल्यू. एस. कोहाडकर यांचा सन २००५मध्ये आदर्श तलाठी पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला होता. आणि आता तलाठी यु. एस. वाघधरे यांचा आदर्श तलाठी पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला आहे. तलाठी यु. एस. वाघधरे सौंदड साजातील शेतकरी व नागरिकांची कामे करतांनी कोणतीही कारणे समोर न करता वेळेवर करतात.