बहुजन समाज पार्टीच्या वतीने काशीरामजी यांचा महापरीनिर्वानदिन साजरा...

बहुजन समाज पार्टीच्या वतीने काशीरामजी यांचा महापरीनिर्वानदिन साजरा...

NEWS15 मराठी प्रतिनिधी - राजु जांभुळे, उमरेड

उमरेड बसपा विधानसभेच्यावतीने दि.१० मंगळवार रोजी उमरेड येथे बामसेफ, डीएसफोर, बहुजन समाज पार्टीचे संस्थापक बहुजन नायक काशिरामजी यांच्या १७व्या परिनिर्वाण दिनानिमित्य प्रतिमेला माल्यार्पण व अभिवादन करून कार्यक्रम साजरा करण्यात आला. याप्रसंगी जेष्ट बसपा सदस्य ए.आर.मेश्राम साहेब नागपूर,बसपा जिल्हा कोषाध्यक्ष प्रियाताई गोंडाने  हे कार्यक्रमाला उपस्थित होते.काशिरामजी ह्यांच्या विविध कार्याची माहीती उपस्थित मान्यवरानी दिली असून,कार्यक्रमाचे संचालन उमरेड विधानसभा प्रमुख पुनेश्वर मोटघरे यांनी केले.तसेच पुनेश्वर मोटघरे  ह्यांची चांपा सेक्टर प्रभारी पदी ह्यावेळी नियुक्ति करण्यात आली.