संत शिरोमणी नामदेव महाराज समाधी सोहळा मलेशियात होणार साजरा...
![संत शिरोमणी नामदेव महाराज समाधी सोहळा मलेशियात होणार साजरा...](https://news15marathi.com/uploads/images/202401/image_750x_6597fe9336e4c.jpg)
NEWS15 मराठी प्रतिनिधी - नारायण काळे
हिंगोली : संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या समाधी सोहळ्याच्या निमित्ताने विश्व भ्रमण दिंडी सोहळा पत्रिकेचे विवेचन संत नामदेव महाराज यांच्या जन्मस्थळापासून शुभारंभ करण्यात आला. यामध्ये संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या जन्मापासूनचा सर्व इतिहास जगात पोहोचविण्यासाठी या विश्व भ्रमण दिंडी महोत्सवाचे आयोजन आळंदी येथील शेषजी महाराज यांच्या वतीने करण्यात आले आहे. यावेळी मार्गदर्शक वृंदावन धामचे स्वामी भारतानंद सरस्वती महाराज यांनी या पत्रिकेचे विवेचन करून या कार्यक्रमाचा शुभारंभ केला आहे.
चक्क हिंगोली जिल्ह्यातल्या संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या जन्म गावापासून ते विदेशातील मलेशिया या ठिकाणी समाधी सोहळ्याचे भव्य स्वरूपात मलेशियात समाधी सोहळा साजरा होणार आहे. यावेळी महाराष्ट्रा मधून अनेक भाविक वारकरी व महाराज मंडळी या विश्व भ्रमण दिंडी सोहळा मध्ये सामील होणार असल्याची माहिती वृंदावन धामचे भारतानंद सरस्वती महाराज यांनी दिली आहे.