धक्कादायक घटना.! 7 महिन्याच्या गर्भवती महिलेसोबत दोन भावांचं अमानवी कृत्य...
![धक्कादायक घटना.! 7 महिन्याच्या गर्भवती महिलेसोबत दोन भावांचं अमानवी कृत्य...](https://news15marathi.com/uploads/images/202308/image_750x_64d742bf32f82.jpg)
NEWS15 मराठी रिपोर्ट - गडचिरोली
राज्यात मागील काही दिवसांपासून महिला व मुलींवरील अत्याचाराच्या निंदनीय घटना समोर येत असून, आजवरची भयाण आणि अमानवी घटना गडचिरोलीतून समोर आली आहे. या घटनेतील नराधमांनी माणुसकीच्या सर्व सीमा पार करत; समाजातील माणुसकी संपली असल्याचे निदर्शनास आणून दिले असल्याचे म्हंटले जात आहे. दोन वासनांध भावंडांनी कुरखेडा तालुक्यातील एका छोट्या गावात गर्भवती महिलेवर तिच्या घरात शिरून अमानुषपणे बलात्कार केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे सदर महिला आपल्या बाळात पणासाठी माहेरी आली असून, सदर पीडित महिला 7 महिन्याची गर्भवती असल्याची महिती समोर आलीय.
मिळालेल्या माहितीनुसार, भावंडांनी कुरखेडा तालुक्यातील एका छोट्या गावात; एका सात महिन्यांच्या गर्भवती महिलेवर तिच्या घरात शिरून अमानुषपणे बलात्कार केला. या संतापजनक घटनेतील दोन्ही आरोपींना कुरखेडा पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. न्यायालयाने त्यांना दोन दिवसांचा पीसीआर दिला आहे. ताराचंद कपुरडेरिया आणि संजय कपुरडेरिया अशी या घटनेतील आरोपींची नावे आहेत. कुरखेडा पोलिस स्टेशनच्या हद्दीत कुरखेडापासून जवळच असलेल्या एका छोट्या गावात गुरूवारच्या रात्री ही घटना घडली. पीडित महिला सात महिन्यांची गर्भवती आहे. ती बाळंतपणासाठी माहेरी आल्याचे समजते. तिचे हे दुसरे बाळंतपण आहे. दरम्यान, गुरूवारी रात्री ही गर्भवती महिला घरात एकटीच असल्याने कपुरडेरिया भावंडांची वासनांध नजर तिच्यावर पडली. त्यांनी संधीचा फायदा घेत आपले काम साधले. त्या असहाय महिलेने आपबिती सांगितल्यानंतर तिला कुरखेडा येथे नंतर गडचिरोली येथे उपचारासाठी पाठविण्यात आले.
कुरखेडा पोलिसांनी दोन्ही आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. शुक्रवारी त्यांना न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांना न्यायालयाने दोन दिवसांचा पीसीआर दिला. या घटनेचा तपास ठाणेदार संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलिस निरीक्षक दिनेश गावंडे करीत आहे.