सामाजिक : कुंडेश्वर घाट परिसर दुर्घटना टाळण्यासाठी उपाययोजनेसाठी ९५ लाखांचा निधी मंजूर,आमदार बाबाजी काळे यांच्या पाठपुराव्याला यश...!
News15 मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील
खेड(राजगुरूनगर) : खेड तालुक्यातील कुंडेश्वर मंदिर घाट परिसरात घडलेल्या अपघातांमुळे स्थानिक ग्रामस्थ व भाविकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. या भागात दरवर्षी मोठ्या प्रमाणावर भाविक, पर्यटक ये-जा करत असतात. याठिकाणी अरुंद घाट रस्ता, रस्त्याला तीव्र उतार आणि रस्ता वळणदार असल्याने अपघाताची शक्यता वाढली होती.

या पार्श्वभूमीवर व स्थानिक ग्रामस्थांच्या मागणीनुसार आमदार बाबाजी काळे यांनी संबंधित विभागांना तातडीने उपाययोजना करण्याची लेखी पत्राद्वारे मागणी केली होती. आमदार बाबाजी काळे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार तसेच जिल्हाधिकारी पुणे आणि अधिकारी वर्गाशी सातत्याने पाठपुरावा सुरु ठेवला होता.

आमदार बाबाजी काळे यांच्या याच पाठपुराव्यामुळे अखेर या कामास शासनस्तरावर तातडीने मंजुरी मिळाली आहे. जिल्हा नियोजन समित पुणे यांनी ०१ नोव्हेंबर रोजी जारी केलेल्या आदेशानुसार, “पार्त्र ग्रामीण विकास निधीअंतर्गत कूंडेश्वर मंदिर प्रांगण परिसरातील अपघात टाळण्यासाठी सुरक्षात्मक उपाययोजनांचे काम” या प्रकल्पासाठी रु. ९,५७,७००/- इतका निधी मंजूर करण्यात आला आहे.

या कामांतर्गत घाट रस्त्याचे रेलिंग बसविणे, संकेतफलक, सुरक्षा उपाय, व पर्यटकांच्या उपयुक्त सोयीसाठी आवश्यक सुविधा उभारण्याच्या उपाययोजना या निधीतून करण्यात येणार आहेत.

या निर्णयामुळे कूंडेश्वर घाट मार्गावरील अपघाताचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल तसेच भाविक व पर्यटकांच्या सुरक्षिततेस मोठा आधार मिळणार आहे. आमदार बाबाजी काळे यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या निधी बद्दल स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
प्रतिक्रिया:
“या परिसरातील अपघातप्रवण भागात सुरक्षा उपाययोजना होणे अत्यंत आवश्यक होते. शासनाने निधीला मंजुरी दिल्याबद्दल आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व जिल्हाधिकारी पुणे आणि संबंधित सर्व अधिकाऱ्यांचे आभार मानतो.” तसेच माननीय मुख्यमंत्री महोदय आणि पालकमंत्री महोदय यांना विनंती केली आहे की मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून प्रस्तावित केलेले दहा कोटीच्या कामाला लवकरात लवकर मंजुरी द्यावी की जेणेकरून पाईट ते कुंडेश्वर मंदिरापर्यंत रस्ता हा सुसज्ज होऊन भाविकांना उपयोगी होईल त्या कामाला देखील लवकरात लवकर मंजुरी मिळेल यात शंका नाही.
-आमदार बाबाजी काळे, खेड-आळंदी विधानसभा