वलखेड येथे सुतार लोहार संघटनेची तालुका बैठक संपन्न...

वलखेड येथे सुतार लोहार संघटनेची तालुका बैठक संपन्न...

NEWS15 मराठी प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक

दिंडोरी तालुक्यातील वलखेड येथे नुकतीच सुतार लोहार तालुका संघटनेची बैठक संपन्न झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कार्यकर्ते मधुकर भागवत हे होते.

बैठकीमध्ये २२ फेब्रुवारी रोजी येऊ घातलेल्या विश्वकर्मा जयंती साजरी करण्याबाबत तसेच विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याने बैठकीमध्ये सत्यनारायण पूजन, मिरवणूक, कीर्तन, रक्तदान शिबिर, विद्यार्थी गुणगौरव सोहळा आधीसह विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.

याप्रसंगी बाळासाहेब शिंदे, रमेश शिरसागर, महिला तालुका अध्यक्ष लक्षणा आहेर, बाळासाहेब जगताप, सोमनाथ जगताप, नारायण राजगुरू, शांताराम पगार, सुनील खैरनार, प्रदीप जाधव, प्रकाश काळे, हेमंत आहेर, राजेंद्र बोराडे, विजय राजगुरू, महेंद्र जाधव आधी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उमेश आहेर यांनी केली तर आभार दत्तात्रय जाधव यांनी मानले.