सुषमाताई अंधारे यांच्या बेतल वक्तव्याविरोधात; दिंडोरी तालुक्यातील शिवसेना आक्रमक...

सुषमाताई अंधारे यांच्या बेतल वक्तव्याविरोधात; दिंडोरी तालुक्यातील शिवसेना आक्रमक...

NEWS15 प्रतिनिधी : बापू चव्हान, नाशिक

उबाठा गटाच्या सुषमाताई अंधारे यांच्या बेतल वक्तव्याच्या व बिनबुडाच्या आरोपाच्या निषेधासाठी दिंडोरी येथे तहसील कार्यालय येथे शिवसेना व दिंडोरी शहर व तालुक्याच्या वतीने जाहीर निषेध करत उबाठा गटाच्या सुषमा अंधारे यांच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले.

नासिकरोड हद्दीतील शिंदेगावात पोलीसांनी ड्रग्जचे दोन कारखाने उध्वस्त करत,दोन संशयीतांना अटक केली.या संशयीतांचा थेट संबंध पालकमंत्री यांच्याशी जोडण्यात आला.सुषमाताई अंधारे यांनी बिनबुडाचा आरोप करत दादा भुसे यांच्यावर आरोप केले.याच बिनबुडाच्या आरोपाच्या विरोधात नासिक जिल्ह्यात पडसाद उमटले.शिवसेना दिंडोरी तालुक्याच्या वतीने सुषमा अधारे यांच्या विरोधात आंदोलन करत तिव्र शब्दात निषेध नोंदविण्यात आला.महाराष्ट्र राज्यचे मुख्यमंत्री शिवसेना मुख्यनेते एकनाथ शिंदे सचिव भाऊसाहेब चौधरी संपर्क प्रमुख सुनिल पाटील,जिल्हा प्रमुख भाऊलाल तांबडे,माजि आ‌.धनराज महाले,सहकारनेते सुरेश भाऊ डोंखळे मार्गदर्शनाखाली दिंडोरी तिला आंदोलन पार पडले.

आंदोलनाच्या वेळी तालुकाप्रमुख किशोर (अमोल) कदम, नगरसेवक सचिन देशमुख, संतोष गांगुर्डे, गटप्रमूख भगवान झिरवाळ, शहरप्रमुख सुरेश शेठ देशमुख, युवासेना शहर प्रमुख निलेश शिंदे, गांगुर्डे आदींसह कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालय येथे तहसीलदार पंकज पवार तसेच दिंडोरी पोलिस निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे यांना निवेदन देण्यात आले.