वैज्ञानिक - औद्योगिक अनुसंधान परिषद आणि CSIR फ्लोरिकल्चर मिशन अंतर्गत, शेतकऱ्यांची कृषी पूरक बैठक...
NEWS15 प्रतिनिधी - साहिल रामटेके
भंडारा - लाखनी : काल मंगळवार दि. 25 जुलै 2023 रोजी; लाखनी तालुक्यातील जेवणाळा येथे वैज्ञानिक तथा औद्योगिक अनुसंधान परिषद व सी. एस.आय.आर. फ्लोरिकल्चर मिशन अंतर्गत जेवणाला येथील आणि आजुबाजूच्या गावातील शेतकऱ्यांची कृषीपूरक बैठक घेण्यात आली.
यावेळी सर्व शेतकऱ्यांना गोंदा या फुलजातीचे ५०,००० हजार; तर शेवंती या फुल जातीचे १५,००० हजार झाडे वाटप करण्यात आले. श्री विजयजी वाघ सर यांनी फुलशेती करण्यासाठी मार्गदर्शन केले. यावेळी ग्राम जेवणाळासह आजूबाजूच्या गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.