चाकण मधील एका शिक्षक पतसंस्थेत चक्क चेअरमनच्या सहीने शिक्षकांनीच काढला स्वत: च्या नावावर लिपिकाचा पगार…!
![चाकण मधील एका शिक्षक पतसंस्थेत चक्क चेअरमनच्या सहीने शिक्षकांनीच काढला स्वत: च्या नावावर लिपिकाचा पगार…!](https://news15marathi.com/uploads/images/202210/image_750x_633805f49ed6e.jpg)
News15 प्रतिंनिधी आशिष ढगे पाटील
चाकण: शहरातील कोटीच्या घरात ठेवी असलेल्या नामांकित पतसंस्थेत त्याच संस्थेचे पदाधिकारी असलेले व चाकण परिसरातील विविध संस्थेत मुख्याध्यापक, सहशिक्षक, क्लार्क पदावर काम करत असलेल्या शिक्षकांनी चक्क स्वतः चेअरमने सही करून या पतसंस्थेच्या लिपिकाचा पगार स्वत: च्या नावावर काढून तो लाखो रुपयांचा पगार गिळंकृत केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यात विशेष म्हणजे त्या पतसंस्थेत लिपिक पदावर कोणताही व्यक्ति काम करत नसल्याचेही निदर्शनात आले आहे.
ज्या शिक्षकांच्या भरोशावर विद्यार्थ्यांचे भवितव्य घडविण्याची जबाबदारी पालकांनी डोळे झाकून टाकलेली असते तेच जबाबदार शिक्षक जर असे कारनामे करत असतील तर, नक्की हे शिक्षक विद्यार्थ्यांचे भवितव्य काय घडवणार? हाच मोठा प्रश्न उभा राहतो. या घोटाळ्याची व्याप्ती खूप मोठी असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यात अनेक असे विद्यार्थ्यांचे भविष्य उद्वस्त करणारे शिक्षक असण्याची माहिती समोर येण्याची शक्यता आहे.
यातील विशेष बाब म्हणजे जेव्हा हे प्रकरण बाहेर आले त्यानंतर विद्यमान चेअरमन याने तातडीने आपल्या पदाचा राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे. यात विशेष म्हणजे ज्या चेअरमने राजीनामा दिला आहे त्याचे तो ज्या संस्थेत काम करतो तेथेही अनेक उलट सुलट कारनामे असल्याचे या अगोदरच News15 मराठीने उघड केले आहेत. त्यामुळे स्वतःला साव समजणारा हा माजी चेअरमन आता नव्या प्रतापामुळे पुन्हा चर्चेत आला आहे.
या पतसंस्थेबद्दल अजून एक धक्कादायक माहिती अशी की, या पतसंस्थेने व्यावसायिक वापरासाठी पतसंस्थेच्या नावाने रहिवाशी झोनमध्ये एक फ्लॅट विकत घेतला असून त्यात हे महाशय ही पतसंस्था चालवत आहेत. विशेष म्हणजे कोणत्याही रहिवाशी झोनमध्ये तुम्ही व्यावसायिक संस्था चालवू शकत नाहीत. जर तशी व्यावसायिक संस्था चालवायची असेल तर, त्याला सहाय्यक निबंधक यांची लेखी स्वरूपाची परवानगी घ्यावी लागते. एवढेच नाही तर, या पतसंस्थेतील चेअरमन व संचालक मंडळाने त्या पतसंस्थेच्या नावाने कोणत्याही प्रकारचा प्रकाशित फलक त्या ठिकाणी लावला नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे या पतसंस्थेचे अनेक काळे कारनामे बाहेर येण्यास सुरुवात झाली आहे. यातून माजी चेअरमन सारखे चोर, स्वतःला गुरुजन म्हणून घेणारे व पतसंस्थेच्या नावाखाली लिपिकाचे पैसे स्वतः हडप करणारे क्रूर प्रवृत्तीचे महाभाग शिक्षक यांचा लवकरच News15 मराठी बुरखा फाडणार असल्यामुळे अनेक अशी चुकीची कामे करणाऱ्या शिक्षकांचे धाबे दनाणले आहेत. पण अशा आपसवराती प्रवृत्तीच्या शिक्षकांच्यामुळे प्रामाणिक शिक्षकांचे नाव बदनाम झाल्याशिवाय राहत नाही. या पतसंस्थेच्या घोटाळ्यातील अनेक उकली लवकरच News15 मराठी पुराव्यासह बाहेर काढणार आहे.