खराबवाडी गावातील अनंत कृपा पतसंस्था निवडणुकीत एकूण २२ पैकी २० अर्ज वैध..!
![खराबवाडी गावातील अनंत कृपा पतसंस्था निवडणुकीत एकूण २२ पैकी २० अर्ज वैध..!](https://news15marathi.com/uploads/images/202302/image_750x_63e6296c3d5fa.jpg)
News15 मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील
चाकण : आर्थिक दृष्टया कोरोडोची उलाढाल असणाऱ्या अनंत कृपा पतसंस्थेच्या निवडणुकीत एकूण २२ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यातील अनुसूचित जाती /जमाती प्रवर्गातील सुरेश भिवजी जगताप यांचा अर्ज जातीचा दाखला, ठेव पावती तसेच पतसंस्थेचा निलचा दाखला नसल्याने त्यांचा अर्ज बाद कर करण्यात आला. सुरेश जगताप यांचा अर्ज बाद झाला नसता तर त्यांची पतसंस्थेच्या संचालक पदी बिनविरोध निवड झाली असती.
तर इतर मागासवर्गीय महिला प्रवर्गातून अर्चना कैलास धाडगे यांचा अर्ज जातीचा दाखला जमा करण्यास विलंब झाल्याने अर्ज बाद ठरविण्यात आला. त्यामुळे उर्वरित राहिलेल्या २० जागेसाठी आता निवडणूक प्रक्रिया पार पडणार कि? निवडणूक बिनविरोध होणार हेच पहावे लागेल.
अनंत कृपा पतसंस्थेचे वैध झालेल्या उमेदवारांचे नावे पुढील प्रमाणे---
१) कड अनिल संभाजी - सर्वसाधारण
२)खराबी शंकर नारायण - सर्वसाधारण
३)कड शशिकांत अर्जुन- सर्वसाधारण
४) केसवड विश्वनाथ खंडू - सर्वसाधारण
५) खराबी रघुनाथ विठ्ठल -सर्वसाधारण
६) खराबी सोपान तुकाराम - सर्वसाधारण
७)खराबी माधुरी शंकर- सर्वसाधारण
८) खराबी प्रकाश ज्ञानेश्वर - सर्वसाधारण
९) कड कविता गोरक्षनाथ - सर्वसाधारण महिला प्रवर्ग
१०) कड हनुमंत जबाजी- सर्वसाधारण
११) सातव ज्ञानेश्वर महादेव - सर्वसाधारण
१२) खराबी माणिक गुलाब - सर्वसाधारण
१३) खराबी हर्षद राजाराम- सर्वसाधारण
१४) खराबी कल्पना विलास - सर्वसाधारण महिला प्रवर्ग
१५) खराबी दत्तात्रय तात्याबा - सर्वसाधारण
१६) बिरदवडे भरत सुदाम -इतर मागास वर्गीय प्रवर्ग
१७) कड सचिन सोपान - सर्वसाधारण व इतर मागास वर्गीय प्रवर्ग
१८) खराबी सतीश ज्ञानोबा - सर्वसाधारण
१९) कड वैशाली मंगेश - महिला प्रवर्ग
९ जागांच्यासाठी एकूण १९ उमेदवार रींगणात असल्याने निवडणूकीला चांगलीच रंगत येणार आहे. आता खरे चित्र माघारी नंतरच समोर येणार आहे.