चारचाकी गाडीतून घरी सोडण्याचा बहाणा करून २० वर्षीय महिलेचा आळंदी घाटात नेवून विनयभंग..!
News15 मराठी प्रतिंनिधी आशिष ढगे पाटील
चाकण : एक २० वर्षीय विवाहित महिला कंपनीतून सुट्टी झाल्यावर घरी जाण्यासाठी गाडीची वाट बघत असताना. एक अनोळखी व्यक्ति चारचाकी गाडीतून येवून मी तुम्हाला तुमच्या घराकडे सोडण्याचा बहाणा करून त्या महिलेला फसवून आळंदीकडे जाणार्या रस्त्यावरील घाटात नेवून तिचा विनयभंग केल्या प्रकरणी एका अज्ञात इसमावर महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार ३ एप्रिल २०२३ रोजी एक २० वर्षीय महिला सिग्मा कंपनी समोरील चौक महाळुंगे येथे देहु गावाकडे जाण्यासाठी वाहनाची वाट बघत उभी होती. त्याचवेळी तेथे एक अनोळखी व्यक्ति पांढर्या रंगाची चारचाकी गाडी घेऊन पीडित मुलीच्या समोर उभा राहिला. अनोळखी व्यक्तीने तुम्हाला देहुला जायचे आहे का? चला मी तुम्हाला देहुला सोडतो असे म्हणून पीडित महिलेला स्वत:च्या चारचाकी गाडीत बसून घेतले.
पीडित महिलेला घेऊन तो गाडीतील व्यक्ति महिंद्रा कंपनीपासून वळण घेत थेट त्याने गाडी आळंदी रस्त्याकडे घेऊन गेला. त्याने आळंदी रस्त्याकडे गाडी घेताच त्याने पीडित महिलेला लज्जा उत्पन्न होईल अशा आशयाचे कृत्य करण्यास सुरुवात केली त्यानंतर पीडित महिलेले आपली त्याच्या तावडीतून कशीबशी सुटका करून घेऊन थेट पोलिस ठाणे गाठले. आणि असे स्रिलंपट कृत्य करणार्या अनोळखी व्यक्तीवर महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यात भा. द. वि. कलम ३५४ नुसार गुन्हा नोंविण्यात आला.
या प्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय जाधव हे करत आहेत.