आनंदाचा शिधा किट यवतमाळ जिल्ह्यात पोहोचलीच नाही? जिल्हा पुरवठा अधिकारी सुधाकर पवार यांची माहिती...
NEWS15 मराठी प्रतिनिधी - किरण मुक्कावार, यवतमाळ
गोरगरिबांचे सण उत्सव आनंदात साजरे करण्यासाठी शिंदे फडणवीस सरकारने आनंदाचा शिधा किट गोरगरिबांना देण्याची घोषणा केली. मात्र रक्षाबंधन सन झाल्यानंतर सुद्धा यवतमाळ जिल्ह्यात गोरगरिबांना आनंदाचा शिधा किट पोहोचलीच नसून, जिल्ह्यात पुरवठा करणाऱ्या पुरवठा दाराने पुरवठा केला नसल्यानं किटचं वाटप करण्यात आलं नसल्याचं जिल्हा पुरवठा अधिकारी सुधाकर पवार यांनी सांगितले आहे.
बहिण भावांचा रक्षाबंधन हा सण उत्साहात साजरा करता यावा म्हणून शिंदे फडणवीस सरकारने आनंदाचा शिधा कीटची घोषणा केली. मात्र रक्षाबंधन सण झाल्यानंतर सुद्धा यवतमाळ जिल्ह्यात आनंदाचा शिधा किट पोहोचलीच नाही शासनाने करारनामा केलेल्या केंद्रीय भंडार संस्थेने यवतमाळ जिल्ह्यात आनंदाचा शिधा किटचा पुरवठा केल्या नसल्यानं जिल्ह्यात आनंदाचा शिधा किट वितरित झाली नसल्याचं; तसेच येत्या दोन-तीन दिवसात जिल्ह्यात पुरवठा झाल्यानंतर आपण वितरित करू असे जिल्हा पुरवठा अधिकारी सुधाकर पवार यांनी सांगितलं आहे.
आनंदाच्या शिधा किटमध्ये रवा,साखर,गोडे तेल, चणाडाळ या वस्तू स्वस्त धान्य दुकानातून शंभर रुपये घेऊन प्रतिपरिवार किटचे वितरण केले जाते, मात्र आजही जिल्ह्यातील पाच लाख 5 लाख 55 हजार 207 शिधा किट धारक नागरिक आनंदाच्या शिधा किट च्या प्रतीक्षेतच आहे.