मतदानाची टक्केवारी वाढवण्याचे आवाहन; जि.प.प्रशासन करणार सन्मान...

मतदानाची टक्केवारी वाढवण्याचे आवाहन; जि.प.प्रशासन करणार सन्मान...

NEWS15 मराठी प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक

लोकसभा निवडणूकीसाठी मतदानाची टक्केवारी दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. याच पार्श्‍वभुमिवर मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी शासनाने विविध उपक्रम राबविले असून मतदानाच्या अधिकाराचा वापर सर्वांनी करावा व मतदानाची टक्केवारी वाढवावी, तसेच सर्वात जास्त मतदान होणार्‍या ग्रामपंचायतींना जिल्हा प्रशासनाच्या वतीने गौरव चिन्ह व प्रशस्तीपत्र देवून सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती देवून मतदान प्रक्रियेत सहभागी व्हावे,असे आवाहन दिंडोरी पंचायत समिती गटविकास अधिकारी नम्रता जगताप यांनी केले आहे. 

 लोकशाहीने दिलेल्या अधिकाराचा प्रत्येक मतदाराने वापर करणे आवश्यक आहे.देशाची लोकशााही बळकट व्हावी व योग्य उमेद्वाराची निवड व्हावी,यासाठी सर्वांनी मतदान करणे अपेक्षित आहे. भारतीय संविधानाने दिलेल्या मतदानाचा पवित्र हक्क बजावण्याची संधी मिळाली आहे.उज्वल भारताची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी व भारताची लोकशाही बळकट होण्यासाठी व आपला आवाज संसदेत पाठविण्यासाठी योग्य व्यक्तीची निवड करा,आपल्या कुटूंबातील सर्व मतदारांनी सोमवार दि.२० मे २०२४ रोजी सकाळी ७.३० वा.ते ५.३० वा. या वेळेत आपले आधारकार्ड, मतदान कार्ड किंवा शासकीय ओळखपत्र घेवून आपल्या मतदान केंद्रावर उपस्थित राहुन मतदान करावे व राष्ट्रीय उत्सवात सहभागी व्हावे. तसेच  सर्वात जास्त मतदान होणार्‍या ग्रामपंचायतींना जिल्हा प्रशासनाच्या वतीने गौरव चिन्ह व प्रशस्तीपत्र देवून सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती देवून मतदान प्रक्रियेत सहभागी व्हावे,असे आवाहन दिंडोरी पंचायत समिती गटविकास अधिकारी नम्रता जगताप यांनी केले आहे.