चिंचखेडला ग्रामपंचायत कडून सहा टीव्ही संच भेट...
![चिंचखेडला ग्रामपंचायत कडून सहा टीव्ही संच भेट...](https://news15marathi.com/uploads/images/202403/image_750x_65f300ab69d22.jpg)
प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक
दिंडोरी तालुक्यातील चिंचखेड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळाला ग्रामपंचायतच्यावतीने इयत्ता पहिली ते पाचवी साठी पाच टीव्ही संच व झेंडफळे वस्ती शाळेसाठी एक टिव्ही संच भेट देण्यात आला.
यावेळी सरपंच संगीता मातेरे ग्रामपंचायत सदस्य दादासाहेब पाटील सुभाष मातेरे,शिवानंद संधान,गोकुळ जगताप,राजेंद्र पाटील,विनायक गटकळ,तंटामुक्तीचे अध्यक्ष सोमनाथ संधान,शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य समाधान फुगट, मान्यवर उपस्थित होते.या कार्यक्रमाप्रसंगी कादवा संचालक दादासाहेब पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या ज्ञानामध्ये अधिक भर पडण्यासाठी टीव्हीवरील काही कार्यक्रम विद्यार्थ्यांना दाखवण्यास उपयुक्त ठरतील व विद्यार्थ्यांचे ज्ञान वाढेल यासाठी शिक्षकांनी प्रयत्नशील राहिले पाहिजे.तसेच तंटामुक्तीचे अध्यक्ष सोमनाथ संधान यांनी डिजिटल साधनांचा वापर करून विद्यार्थ्यांच्या ज्ञानामध्ये भर पडण्यासाठी आपल्या शाळेतील सर्व शिक्षक प्रयत्नशील असल्याचे नमूद केले. शाळेचा नावलौकिक वाढवण्यास शाळेतील मुख्याध्यापक सर्व शिक्षकांचा सहभाग इथून पुढे कायम राहील अशी अपेक्षा व्यक्त केली.शिवानंद संधान यांनी सांगितले की आपली जिल्हा परिषद शाळा ही उपक्रमशील असल्याचे एक आदर्श परिसरामध्ये असल्याचे नमूद केले.ग्रामविकास अधिकारी नानासाहेब तांबे यांनी शाळेला टीव्ही संच उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न केले टिव्ही संच मिळाल्याबद्दल मुख्याध्यापक चौधरी व शिक्षकांनी ग्रामपंचायतीचे आभार मानले.
याप्रसंगी ठाकरे रविंद्र पाटील, सुधाकर भामरे,विठ्ठल डंबाळे दत्ता राठोड उपस्थित होते. प्रास्ताविक प्रकाश पाटील यांनी केले व आभार प्रदर्शन शंकर ठाकरे यांनी मानले.