भारतीय जनता पार्टीच्या उत्तर पुणे जिल्हा शिरूर लोकसभा समन्वयक पदी संदिप सोमवंशी यांची नियुक्ती...!
News15 मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील
चाकण : भारतीय जनता पार्टीच्या उत्तर पुणे जिल्हा शिरूर लोकसभा समन्वयक पदी खराबवाडी गावचे सुपुत्र संदिप शंकरराव सोमवंशी यांची भाजपा प्रदेश संघटन मंत्री मकरंद देशपांडे, भाजपा पुणे जिल्हा अध्यक्ष शरद बुट्टे पाटील यांच्या आदेशाने नियुक्ती करण्यात आली आहे.

या अगोदरही संदिप सोमवंशी यांनी पक्षाच्या विविध पदांवर कामे केले आहेत. ते पक्षाचे जुने एकनिष्ठ कार्यकर्ते म्ह्णून पुणे जिल्ह्यात ओळखले जातात. संदिप सोमवंशी यांच्यावर सध्या शिरूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या नेत्यांमध्ये समन्वय राखणे, वरिष्ठ नेत्यांच्या संभाचे नियोजन करणे, कोणत्या मतदारसंघात कोणत्या नेत्याची सभा घेतल्यानंतर त्याचा फायदा महायुतीच्या उमेदवारीला कसा होईल याचे सर्व सूक्ष्म नियोजन आता संदिप सोमवंशी व त्यांचे सहकारी करणार आहेत. त्यांच्यावर मोठी जबाबदारी आल्याने ती लिलया पार पाडण्यासाठी मी सर्वांना बरोबर घेऊन काम करणार असल्याची भावना त्यांनी बोलून दाखवली.

या निवडीवेळी आळंदी नगरपरिषदेचे नगराध्यक्ष अशोक उमरगेकर, भाजपा पुणे उपाध्यक्ष राजनभाई परदेशी तसेच खेड तालुका भाजपा अध्यक्ष शांताराम भोसले आदी पदाधिकारी उपस्थित होते.