उन्नती माध्यमिक विद्यालय येथे; सखी- सावित्री समिती'तर्फे विद्यार्थिनींना प्रबोधन...
![उन्नती माध्यमिक विद्यालय येथे; सखी- सावित्री समिती'तर्फे विद्यार्थिनींना प्रबोधन...](https://news15marathi.com/uploads/images/202409/image_750x_66ea458474b99.jpg)
प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक
आज उन्नती माध्यमिक विद्यालय तळेगांव येथे "सखी- सावित्री समिती" ने एक आदर्श कार्यक्रम आयोजित केला. कार्यक्रमाची सुरवात सरस्वती प्रतिमेच्या पूजनाने सुरूवात करण्यात आली,यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक किशोर राणे,तळेगावचे उपसरपंच प्रविण कथार,दिंडोरी पोलिस ठाण्याच्या सहाय्यक पोलिस निरिक्षक जाधव,वैद्यकिय अधिकारी सिंधू शालेय शिक्षक- पालक संघाचे उपाध्यक्ष गोविंद ढाकणे,तसेच मोतीराम बेंडकुळे,मधुकर चौधरी, गोकुळ चौधरी ,संतोष चारोस्कर व अंगणवाडी सेविका कविता सोनवणे,सुमन चौधरी,आरोग्य सेविका सविता जाधव आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक किशोर राणे यांनी केले,तसेच पोलीस पाटील रोशन परदेशी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करुन मुलींना काही अडचण असल्यास किंवा समस्या असल्यास पोलीस पाटील या नात्याने आमची सर्व टीम सदैव तत्पर राहील व त्या गोष्टीला आळा घातला जाईल असे आश्वासन दिले.
मोतीराम बेंडकुळे यांनी देखील सखी-सावित्री समिती म्हणजे काय व तिचे उद्देश व कार्य याबाबत सविस्तर माहिती दिली.तसेच प्रमुख अतिथी दिंडोरी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक गायत्री जाधव यांनी विद्यार्थ्यांना प्रबोधन करून वातावरण भावनिक बनवले,मुलीनी काही पाऊल उचलताना प्रथम आपल्या आई -वडील यांचा विचार करावा तसेच पालकांनी मुलगा-मुलगी असा भेद न करता दोघांना समान लेखले पाहिजे तसेच मुलींना कोणत्याही प्रकारची मदत लागल्यास मी तत्पर असेल अशी ग्वाही दिली.
सूत्रसंचालन मुसळे यांनी केले तर आभार बीरारी यांनी मानले, कार्यक्रम यशस्वीतेसाठी किशोर क्षिरसागर अमोल पवार,कुणाल जाधव, कोराळे, खैरनार, अहिरे, मुसळे बीरारी योगेश ढाकणे, बापू कोठावदे यांनी परिश्रम घेतले.