ढोल ताशाच्या गजरात उमरखेड मध्ये लाडक्या बाप्पाचे आगमन...

ढोल ताशाच्या गजरात उमरखेड मध्ये लाडक्या बाप्पाचे आगमन...

NEWS15 मराठी प्रतिनिधी -  किरण मुक्कावार, यवतमाळ

गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरयाच्या जय घोषात; मंगळवारी शहरात तसेच सार्वजनिक ठिकाणी व घरगुती गणपतीची स्थापना करून, विधिवत पूजन करण्यात आले. यानिमित्ताने उमरखेड शहरात भक्तीमय वातावरण निर्माण झाले असून, मोठ्या उत्साहात गणेश उत्सवाला प्रारंभ झाला आहे.

तर सजावटीसाठी लागणारे साहित्य बाजारात उपलब्ध झाले आहे. पूजेसाठी लागणारी तसेच सजावटीची फुले, केवड्याची पाने, कमळ, दुर्वा, तुळशी पत्री यांना चांगली मागणी होती. भाद्रपद शुद्ध चतुर्थीला म्हणजेच मंगळवारी दि. 19 रोजी गणरायाची भक्तिमय वातावरणात अनेक घरात स्थापना करण्यात आली. तर सार्वजनिक गणेश उत्सवाच्या ठिकाणी धार्मिक कार्यक्रमाबरोबरच सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. प्रशासनही कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी प्रयत्न करीत आहे आणि तसा बंदोबस्त ठेवण्यात येत आहे.