शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी काँग्रेसनं काढला चटणी-भाकर मोर्चा...
![शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी काँग्रेसनं काढला चटणी-भाकर मोर्चा...](https://news15marathi.com/uploads/images/202312/image_750x_6585c30995397.jpg)
प्रतिनिधी गजू कैलासवार, पाटणबोरी
यवतमाळ : केळापूर तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा तसेच शेतकऱ्यांच्या विविध समस्यांना घेऊन आज काँग्रेस कमिटीचे जिल्हा सरचिटणीस जितेंद्रभाऊ मोघे यांच्या नेतृत्वात; राष्ट्रीय काँग्रेस कमिटी केळापूर तालुक्याच्यावतीने क्रीडा मिञ मंडळ ते तहसिल कार्यालयावर भव्य चटणी/भाकर मोर्चा काढण्यात आला.
या मोर्चात तालुक्यातील शेकडो शेतकरी सहभागी झाले होते. कृषी विभाग, वन विभाग, बँका, महावितरण व याचबरोबर आणि विभागांकडून शेतकऱ्यांना होत असलेल्या जाचक त्रासांवर तोडगा काढून, शेतकऱ्यांच्या अन्य मागण्यांची पूर्तता करावी अशी मागणी या मोर्चा मधून करण्यात आली.
तर या आशयाचे निवेदन आणि चटणी भाकर देऊन ह्या शेतकऱ्यांच्या व्यथा तहसीलदार यांचे समोर मांडण्यात आल्या. यावेळी तालुक्यांतील सर्व काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या सह शेकडो शेतकरी बांधव उपस्थित होते.