घाटकोपर घटनेची पुन्हा: पुनरावृत्ती? पिंपरी चिंचवड शहरातील मोशी परिसरात होर्डिंग कोसळले...

घाटकोपर घटनेची पुन्हा: पुनरावृत्ती? पिंपरी चिंचवड शहरातील मोशी परिसरात होर्डिंग कोसळले...

NEWS15 मराठी प्रतिनिधी - विश्वनाथ केसवड

पिंपरी चिंचवड : मुंबईतील घाटकोपर येथे होर्डिंग कोसळून १६ जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना ताजी असतानाच.! आज पुन्हा अशीच काहीशी पुनरावृत्ती पिंपरी चिंचवड शहरात पाहायला मिळाली आहे. सुदैवाने यात जीवितहानी झाली नसल्याचे प्रथमदर्शी सांगण्यात येत आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील मोशी येथे रस्त्याच्या बाजूचं लोखंडी होर्डिंग कोसळलं आहे. होर्डिंगखाली तीन ते चार दुचाकी आणि माल वाहतूक करणारा टेम्पो दबल्यामुळे मोठं नुकसान झाल्याचं सांगितले जात आहे.

पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील मोशी येथील जय गणेश साम्राज्य चौकातील फ्लेक्स लावलेला होल्डिंग कोसळलेला आहे. घटना आज (दि.16 मे) रोजी दुपारी साडेचार च्या सुमारास घडली आहे. पिंपरी चिंचवड शहर आणि परिसरात सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पावसाने अचानक जोरदार हजेरी लावली. अवकाळी पाऊस आणि सोसाट्याचा वारा जोराचा असल्यामुळे; जय गणेश साम्राज्य मोशी या चौकातील होल्डिंग लावलेला फ्लेक्स खाली पडला. तर हा फ्लेक्स अधिकृत आहे? का अनाधिकृत.! याची माहिती अद्याप समोर आली नसून, अशा दुर्घटनांना आळा बसवण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि प्रशासन मंडळ काय प्रयत्न करणार हेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.