२ लाखांची अवैध विदेशी दारू जप्त; पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई...
प्रतिनिधी : विश्वनाथ केसवड पिंपरी-चिंचवड
पिंपरी-चिंचवड शहरात गुन्हे शाखा युनिट-३ ने मोठी कारवाई करत सुमारे २,००,४८० रुपयांचा अवैध विदेशी दारू साठा जप्त केला आहे. या प्रकरणी तीन आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्या विरोधात दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखेचे पथक दिघी परिसरात पेट्रोलिंग करत असताना पोलीस अंमलदार सोमनाथ बोऱ्हाडे यांना गुप्त माहिती मिळाली. दाभाडे सरकार चौकाजवळील एका शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये काही जण विदेशी दारूचा साठा करून विक्री करत असल्याची खात्रीशीर माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ सापळा रचला.
अटक आरोपीची नावे पुढीलप्रमाणे
रामप्रसाद साहेबराव साळुंखे (वय ३३, रा. चऱ्होली, पुणे)
तिलक हेमंत पटेल (वय २१, रा. वापी, गुजरात)
अनिल रामसुरत यादव (वय २४, रा. वापी, गुजरात)
*जप्त मुद्देमाल*
रॉयल चॅलेंज कंपनीचे ६ बॉक्स व ४०० सुट्या बाटल्या
इम्पेरिअल ब्लू कंपनीचे ८ बॉक्स
रॉयल स्ट्रॉग कंपनीचे ६ बॉक्स
आरोपींचे ३ मोबाईल फोन
एकूण किंमत: २,००,४८० रुपये
ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. तसेच सह पोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड आणि पोलीस उपआयुक्त (गुन्हे) डॉ. शिवाजी पवार यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शाखेने ही धडक कारवाई केली.
या मोहिमेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष कसबे, उपनिरीक्षक सुनील जावळे आणि त्यांच्या पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली.
पिंपरी-चिंचवडमध्ये अवैध दारू विक्रीवर पोलिसांचा करडी नजर असून अशा कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचे संकेत मिळत आहेत.