ठाकरेंच्या नेत्याचा दाऊदच्या हस्तकांबरोबर (मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी) पार्टीचा video व्हायरल, तर आमदार राणेंकडून चौकशीची मागणी...

ठाकरेंच्या नेत्याचा दाऊदच्या हस्तकांबरोबर (मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी) पार्टीचा video व्हायरल, तर आमदार राणेंकडून चौकशीची मागणी...

NEWS15 मराठी रिपोर्ट - नागपूर

शिवसेना ठाकरे गटाचे नाशिकमधील पदाधिकारी सुधाकर बडगुजर यांचा अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा सहकारी सलीम कुत्ता याच्यासोबत संबंध असल्याचा आरोप भाजपचे आमदार नितेश राणे यांनी केला असून, सलीम कुत्ता पॅरोलवर बाहेर असताना त्यानं बडगुजर यांच्यासोबत पार्टी केल्याचं नितेश राणेंनी म्हटलं आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा सहकारी सलीम कुत्ता हा १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटातील एक प्रमुख आरोपी आहे. हिंदुत्ववादी म्हणवणाऱ्या पक्षाकडून यांना संरक्षण कसं दिलं जातं, असा सवालही नितेश राणे यांनी उपस्थित केला. दरम्यान, नितेश राणेंनी विधानसभेत केलेल्या आरोपांची एसआयटी चौकशी केली जाईल अशी घोषणा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलीय.

यावेळी आमदार राणे म्हणाले की, आम्ही ट्रेलर देण्याचं काम केलं आहे. आता सखोल चौकशी केली जावी असं सांगत.! यांनी पार्टी मातोश्रीमध्येप पण होती का? असा सवाल उपस्थित केला आहे. सुधाकर बडगुजरला तातडीने अटक करावं, तो बाहेर राहिल्यास पुरावे नष्ट करेल अशी मागणीही नितेश राणे यांनी केली आहे. सुधाकर बडगुजर हे शिवसेना ठाकरे गटाचे नाशिकमधील महागनर प्रमुख आहेत. नितेश राणे यांनी या दोघांच्या पार्टीचे फोटो विधानसभेत दाखवले. विधानसभेतील चर्चेदरम्यान नितेश राणे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. "मुंबई बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी दाऊद इब्राहिमचा साथीदार सलीम कुत्ता याच्यासोबत सुधाकर बडगुजर याचे संबंध काय? सुधाकर बडगुजर हे सलीम कुत्तासोबत पार्टी करताना दिसत आहेत. बडगुजर यांना कोण पाठिशी घालतंय? त्यांचा पॉलिटीकल गॉडफादर कोण? या प्रकरणाची चौकशी व्हावी", अशी मागणी नितेश राणेंनी सभागृहात केली.

तर नितेश राणे यांनी केलेल्या आरोपानंतर सुधाकर बडगुजर यांनी पत्रकार परिषद घेत स्पष्टीकरण दिल आहे. वेगळ्या विदर्भाची मागणीसाठी सभा होती आणि त्यावेळी आम्ही आंदोलन केलं होतं. त्यावेळी आमच्यावर गुन्हे दाखल केले होते. माझ्यासह अनेक लोक जेलमध्ये होते. त्यावेळी बॉम्ब स्फोटातील आरोपीपण जेलमध्ये आहेत हे आम्हाला माहिती नव्हते. माझ्यावर एक साधी 'एनसी'सुद्धा दाखल नव्हती. राजकीय हेतुनं प्रेरित होऊन गुन्हे दाखल केले होते. सलीम कुत्ता याला 93 मध्ये अटक केली होती. त्यामुळे ते कैदी म्हणून होते. बेबनाव केला आहे तसेच व्हिडिओमध्ये मॉर्फिंग केले आहे. त्यामुळं सलीम कुत्ता याच्यासोबत माझे संबंध नाहीत, असं स्पष्टीकरण सुधाकर बडगुजर यांनी दिलंय.

दरम्यान विधिमंडळात नितेश राणे यांनी व्हिडिओ दाखवल्यानंतर नाशिकची क्राईम ब्रँच ऍक्टिव्ह झाली आहे. कुख्यात गुन्हेगार दाऊदच्या कार्यकर्त्यांबरोबर बडगुजर नृत्य करत असल्याने त्यांचे संबंध देश विघातक कारवाया करणाऱ्या लोकांसोबत असल्याचं समोर आल आहे.  पोलिसांनी बडगुजर यांच्या कार्यालयातील त्यांचा कार्यकर्ता पवन मटाले याला ताब्यात घेतले आहे