धनराज महाले यांची बंडखोरी.! नरहरी झीरवाळ यांना डोकेदुखी?

धनराज महाले यांची बंडखोरी.!  नरहरी झीरवाळ यांना डोकेदुखी?

प्रतिनिधी - बापू चव्हाण,  नाशिक

दिंडोरी पेठ मतदार संघाचे माजी आमदार व शिंदे गटाचे नेते धनराज महाले यांनी आज त्यांचा उमेदवारी अर्ज शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भाऊलाल तांबडे व सुरेश डोखळे व शेकडो कार्यकर्त्याच्या  उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे,विधानसभा उपाध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसचे उपमुख्यमंत्री अजित पवार पक्षाचे उमेदवार नरहरी झिरवाळ याना महायुतीचे तिकीट मिळाल्याने माजी आमदार धनराज महाले यांनी बंडखोरी करून दिंडोरी पेठ विधानसभेसाठी अपक्ष उमेदवारी अर्ज भरल्याने दिंडोरी तालुक्यात राजकारणाचे वातावरण तापले आहे,कोणत्याही परिस्थितीत आमदार झिरवाळ याचा पराभव करणारच असा निर्धार माजी आमदार धनराज महाले यांनी केला आहे.त्यामुळे आमदार झिरवाळ याना यंदा महायुती मधूनच मोठे आव्हान आले आहे.हि बंडखोरी रोखण्यासाठी महायुतीच्या नेत्यांना आतापर्यंत यश आलेले नाही,तरीपण महायुतीचे नेते माजी आमदार धनराज महाले याना थांबविण्याचा प्रयत्न करणार कि नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे.

तसेच दिंडोरी पेठ विधानसभेचे आमदार व विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांना महाविकास आघाडी कडून उमेदवारी मिळाल्याने त्यांनी आज दुपारी १ वाजेच्या सुमारास आपला उमेदवारी अर्ज दिंडोरी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे दाखल केला आहे.अशा स्थितीतच आमदार झिरवाळ याना महायुती तुनच बंडखोरी चे आव्हान आल्याने झिरवाळ याना यंदाच्या निवडणुकीत अनेक अडचणींना सामोरे जावे लागणार असल्याची चिन्हे दिसून येत आहे,

या पार्श्वभूमीवर आमदार झिरवाळ यांनी एक अजब दावा केला कि,मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते व कार्यकर्ते याच्या बळावर उमेदवारी करीत आहे,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दोन गट असले तरी देखील मला जेष्ठ नेते शरद पवार याचे दुरून आशीर्वाद असतील.राष्ट्रवादी कांग्रेस अजित पवार पक्षाचे काही पदाधिकारी आणि नेत्यासह आमदार झिरवाळ यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.आमदार झिरवाळ सलग तिसऱ्यादा उमेदवारी करीत आहे,यापूर्वीही दोन वेळा ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आमदार म्हणून निवडून आले आहे.तसेच माजी आमदार रामदास चारोस्कर यांच्या सौभाग्यवती माजी समाज कल्याण सभापती सुनिता चारोस्कर यांनी दोन महिन्यापूर्वीच शरदचंद्र पवार गटात जयंत पाटील व श्रीराम शेटे यांच्या मेळाव्यात दिंडोरी येथे प्रवेश केला होता. परंतु महाविकास आघाडीच्या उमेदवाराची तिकीट आज पर्यंत जाहीर न झाल्याने सुनिता चारोस्कर  यांनी अपक्ष उमेदवारीचा फॉर्म भरला आहे.तसेच शरदचंद्र पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे व श्रीराम शेटे याचे निष्ठावन्त कार्यकर्ते संतोष रेहरे हे एक वर्षांपासून दिंडोरी व पेठ तालुक्यात प्रकत्येक गावात आपली ओळख व भेटीगाठी घेत होते, तसेच प्रत्येक गावातील कार्यक्रमांना हजेरी लावून ग्रामस्थांची विचारपूस करीत होते, कारण कि शरदचंद्र पवार गटाचे तिकीट मला च भेटणार या आशेने संतोष रेहरे यांनी दिंडोरी व पेठ तालुका मधील गावो -गाव पिंजून काढला आहे.

त्यामुळे संतोष रेहरे यांनी शरदचंद्र पवार गटाकडून  उमेदवारी अर्ज भरला आहे.त्यामुळे महाविकास आघाडीत पण बंडखोरी होण्याचे चिन्ह दिसत आहे, तसेच दिंडोरी  पंचायत समितीचे माजी सभापती व उबाटा गटाचे नेते एकनाथ खराटे यांनी पण अनेक उबाटा गटाच्या कार्यकर्त्याना घेऊन अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.एकनाथ खराटे हे महाविकास आघाडीत बंडखोरी करणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे.परंतु महाविकास आघाडीची उमेदवारी जाहीर होत नाही तोपर्यंत कोणीच सांगू शकत नाही की कोण बंडखोरी करणार.