गोंदिया जिल्ह्यात ३ दिवसापासूनच्या सलग पावसाने नदी नाल्यां तुडुंब, नागरिकांना सतर्कतेचा इशारा...
![गोंदिया जिल्ह्यात ३ दिवसापासूनच्या सलग पावसाने नदी नाल्यां तुडुंब, नागरिकांना सतर्कतेचा इशारा...](https://news15marathi.com/uploads/images/202307/image_750x_64b4c28fa742a.jpg)
NEWS15 प्रतिनिधी - साहिल रामटेके
गोंदिया : गोंदिया जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून सलग पावसाच्या सरी बरसत असल्याने, जिल्ह्यातील अनेक भागात नदी - नाल्यांना पूर आला आहे. तसेच पुलांवरून पाणी वाहत असल्याने, बऱ्याच गावांचा संपर्क देखील तुटला आहे.
गोंदिया जिल्ह्याच्या अनेक ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा तर काही भागात मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे गोंदिया जिल्ह्यातील अनेक नदी नाल्यांना पूर आला असून, अशा भागात वाहतूक खोळंबली आहे. तर काही गावांचा संपर्क देखील तुटला असल्याने, सतत सुरू असणाऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील प्रकल्प तुडुंब भरले आहे. सततच्या पावसामुळे प्रकल्पातील पाण्याचा विसर्ग केला जाण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील आठही तालुक्यात दमदार पाऊस कोसळत असल्यामुळे नदीकाठी राहणाऱ्या ग्रामस्थांना सतर्क राहण्याचा इशारा देखील हवामान खात्याच्या वतीने देण्यात आला आहे.
.