धक्कादायक घटना.! ताह्मणी घाटात सहलीच्या बसचा अपघात, 2 जण ठार तर अन्य गंभीर जखमी...
![धक्कादायक घटना.! ताह्मणी घाटात सहलीच्या बसचा अपघात, 2 जण ठार तर अन्य गंभीर जखमी...](https://news15marathi.com/uploads/images/202312/image_750x_658f97ca0ea13.jpg)
NEWS15 मराठी रिपोर्ट - रायगड
वर्षाचा शेवटचा महिना डिसेंबर आणि नवं वर्षाच्या जानेवारी महिन्यात अनेक प्राथमिक/माध्यमिक आणि विद्यालयीन मूल-मुलींच्या सहली शालेय प्रशासनाकडून राज्यभर काढल्या जातात. परंतु, मागील काही दिवसांपासून या सहलीकाढत असतांना; सुरक्षतेचा आणि इतर गोष्टीचा मात्र विचार केला जात नसल्याचे दिसत आहे. आणि त्यामुळंच की काय? आज घडीला अशा प्रवासा (सहलीच्या) प्रसंगी अपघाताच्या अनेक घटना घडत असल्याचे दिसत आहे.
अशीच एक धक्कादायक आणि आनंदावर विरजण घालणारी घटना रायगडमधून समोर आली आहे. पुण्याहून कोकणात जात असताना; माणगाव ते पुणे दरम्यानच्या ताम्हीणी घाटात एक खासगी बस उलटल्याने मोठा अपघात झाला आहे. अपघातानंतर तातडीने महाड, माणगाव इथून रुग्णवाहिका घटना स्थळाकडे रवाना करण्यात आल्या आहेत. रायगड जिल्ह्यातील ताह्मणी घाटात सहलीची बस उलटली असून, या अपघातात 2 जण ठार झाले तर अनेक जण जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनीही घटनास्थळाकडे धाव घेतली आहे.
पुणे ते माणगावदरम्यानच्या ताम्हीणी घाटात एका अवघड वळणावर (कोंडेघर गावाच्या हद्दीत) हा भीषण अपघात झाला आहे. तर पुण्याहून शाळेची सहल कोकणात जात होती.