विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी - चव्हाण

विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी - चव्हाण

सध्या सर्वत्र शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी महिलांची गर्दी दिसत असून प्रत्येक महिलांच्या हातामध्ये कागदपत्र दिसत आहे.हे कागदपत्र झेरॉक्स केली जातात मात्र अटेस्टेड सत्यप्रत करण्यासाठी विशेष कार्यकारी अधिकारी नसल्याने महिला वर्गाची मोठी तारांबळ उडत असल्याने विशेष कार्यकारी अधिकारी यांची नियुक्ती करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते बापू चव्हाण यांनी केली आहे.

विद्यार्थ्यांच्या शालेय कामासाठी शासकीय कागदपत्रे यासाठी तसेच महसूल विभागातील ओरिजनलच्या कागदपत्रांच्या झेरॉक्स वर सत्यप्रत म्हणून व रहिवासी दाखले देण्यासाठी  प्रशासनाने विशेष कार्यकारी अधिकारी सरपंच ग्रामपंचायत नगराध्यक्ष नगरसेवक यांना शासनाच्यावतीने विशेष अधिकार प्राप्त दिलेल्या असतात.परंतु  निवडणुका लांबल्यामुळे सदरील पद हे रिक्त असल्याने याशिवाय माजी लोकप्रतिनिधींना अधिकार नसल्यामुळे सर्व सामान्य जनतेची यामुळे घालमेल होत असून त्यांना सतत भटकंती करावी लागते हे पद  रिक्त असल्याने नागरिकांमध्ये इतरांबरोबर मतभेद होताना दिसत आहे.

विद्यार्थ्यांच्या शाळेच्या प्रवेशा च्या वेळेस शिष्यवृत्तीसाठी लाडकी बहीण योजना तसेच शासनाच्या विविध योजनांसाठी तसेच इतर कामासाठी झेरॉक्स प्रमाणिकरण सत्यप्रत पेपर शासनाकडून मागितले जातात परंतु सध्या रहिवासी दाखला व अटेस्टेड करण्याचा कोणताही अधिकार लोकप्रतिनिधींना व विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांना नसल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना विद्यार्थ्यांना याचा मोठ्या प्रमाणात फटका बसत आहे.तरी संबंधित अधिकाऱ्यांनी याबाबत त्वरित निर्णय घेऊन विशेष कार्यकारी अधिकारी यांची नियुक्ती करावी अशी मागणी चव्हाण यांनी केली आहे.