तळेगाव दिं. येथे तब्बल २१ वर्षांनी भरली माजी विद्यार्थ्यांची शाळा...
प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक
दिंडोरी - ज्या शाळेत शिकून ज्ञानाची सावली मिळाली त्या शाळेविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तब्बल २१ वर्षानंतर माजी विद्यार्थी स्नेह मेळाव्याच्या निमित्ताने एकत्र आले जुन्या आठवणींना उजाळा देत मित्र मैत्रिणींची भेट होतच त्यांना शाळेचे सारे जुने दिवस आठवले.
आवडते मज मनापासुनी शाळा,लावते लळा जशी माऊली बाळा शाळा हि प्रत्येकाच्या जिवनात आई वडिलानंतर संस्काराची शिदोरी आणी उज्वल भविष्याची वाट दाखवणारी असते.ज्या शाळेत आपण शिकलो,खेळलो,मोठे झालो ती शाळा आणी त्या शाळेच्या आठवणी आयुष्यात कधीही न विसरल्या जात नाहीत.हे सत्य आहे.लहानपणी नकोशी वाटणारी शाळा नंतर हवीहवीशी वाटते जि.प.प्रा.शाळा, उन्नती विद्यालयातील तर गोष्टच काही औरच असते.याचा प्रत्यय रविवार दि. १२ रोजी उन्नती माध्यमिक विद्यालयातील २००३ मध्ये १० वीत असलेल्या माजी विद्यार्थ्यांच्या मेळावा संपन्न झाला.काही विद्यार्थी / विद्यार्थीनी जवळपास ३० वर्षानंतर तर काही २१ वर्षांनंतर एकञ आलेल्या मिञांनि शाळेत असतांना केलेल्या गमती जमती शिक्षकांनी केलेली शिक्षा,अशा अनेक आठवणींना उजाळा दिला.
विविध क्षेञात कार्यरत असलेले विद्यार्थी या वेळी एकञ आले. धकाधकीच्या आयुष्यात प्रत्येक जण आपापल्या कामात गुंतलेला आहे. माञ विद्यालयातील आठवण कायम येत असल्याने प्रत्येकाच्या तोंडुन आठवण निघत होती.
याच पाश्चभुमिवर तळेगाव दिं. येथिल ईयत्ता १ लीच्या जी.प. प्राथमिक शाळेतील व उन्नती विद्यालयातील विद्यार्थी पुन्हा एकत्र आल्याने अनेक जुन्या आठवणींना नव्याने उजाळा मिळाला अनेकांना आपले शाळेचे जुने मिञ- मैञीणी भेटल्या मुळे त्यांच्या चेहर्यावरील आनंद ओसंडुन वाहत होता.सन २००३ या वर्षात तळेगाव दिं येथिल विद्यालयात शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांनी पेरूची वाडी येथे भेट दिली .यावेळी शिक्षक एन.एल.नेर आर.बी.कोठावदे,आर.एस.पितृभक्त एस.बी.सोनजे, यांचा विद्यार्थ्यांनी शाल,गुलाबपुष्प व फोटो फ्रेम देऊन सत्कार केला. यावेळी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. काही विद्यार्थ्यांनी आम्ही तुमच्यामुळेच घडलो. अशा भावना व्यक्त नतमस्तक झाले. याप्रसंगी सचिन ढाकणे,रविंद्र घुगे,योगेश आंबेकर,भुषण दरगोडे विकास दरगोडे,ज्ञानेश्वर पोटकुले किरण जाधव,दिपक चौधरी,संदिप राजगुरू,संदिप उगले,बाळु निंबाळकर भालचंद्र मुळाणे,बापु खुर्दळ,भारत गांगुर्डे,रूपेश वाघ,सुचिता सानप, प्रतिभा पाटील,संगिता चौधरी, पुष्पा ढाकणे,रत्ना घुगे,मालती घुगे,मंगला गांगुर्डे,सविता जाधव मोनिका चकोर,धनश्री कांगणे,विद्यार्थी शिक्षकवृंद शिक्षकवृंद उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुञसंचालन ज्ञानेश्वर पोटकुले यांनी केले.आभार सुचिता सानप यांनी मानले.