हिंदुहृदसम्राट शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती समाज उपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करून साजरी...!

हिंदुहृदसम्राट शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती समाज उपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करून साजरी...!
हिंदुहृदसम्राट शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती समाज उपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करून साजरी...!

News15 मराठी प्रतिनिधी अस्लम शेख 

लातूर : अहमदपूर येथे बाळासाहेबांची शिवसेनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वरुढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या कार्यक्रमास सुरुवात केली. सर्वप्रथम दैवत हिंदुहृदसम्राट शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतीमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. तदनंतर वेगवेगळे समाजउपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

यामध्ये गरजू लोकांना चादर वाटप व फराळ वाटप, अन्नदान, वृक्ष लागवड, बाळासाहेबांच्या विविध फोटो प्रदर्शित करण्यात आले असे वेगवेगळ्या कार्यक्रमांनी जयंती साजरी करण्यात आली. बाळासाहेबांची शिवसेना ग्रामीण जिल्हा प्रमुख गोपाळ माने व उपजिल्हा प्रमुख गणेश पांचाळ तसेच तालुका प्रमुख गोपीनाथ जायभाये यांनी अभिवादन करुन बाळासाहेबांचे विचार जनसामान्यांपर्यंत व सर्वसामान्य जनतेच्या अडचणी सोडवण्यासाठी अभिवचन दिले. बाळासाहेबांची शिवसेना बळकट करण्यासाठी तन मन धनानी सेवा करून येणाऱ्या नगर पालिका निवडणूकीत जास्त जास्त नगरसेवक निवडुन आणुन शहराचा विकास करण्यासाठी प्रयत्न करु व बाळासाहेबांचे स्वप्न साकार करु असे संबोधित केले.

यावेळी छ्त्रपती शिवरायांच्या प्रेरणेने आणि शिवछत्रपतीना आराध्य मानून जीवन जगलेले हिंदुहृदसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे ही केवळ एक व्यक्ती नसून ते एक विचार आहेत. जोपर्यंत तो विचार तुमच्या आमच्या मनात जिवंत आहे तोपर्यंत या राष्ट्रामध्ये तेजस्वी युवक घडत राहतील. व्यवस्था बदलण्यासाठी जनतेला जागरूक करावे लागेल त्यासाठी जनतेसाठी त्यांच्यात राहून काम करावं लागेल तर आणि तरच एक तेजस्वी राष्ट्र निर्माण होईल. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारास प्रमाण मानून काम करण्याचा संकल्प सर्वांनी घेतला आणि त्यांच्या विचारांवर आयुष्य भर चालणे हेच खरे अभिवादन असे प्रतिपादन शिवसेना शहरप्रमुख लक्ष्मण अलगुले यांनी केले.

सम्राट मित्रमंडळ संचालक डॉ.सिध्दार्थकुमार सुर्यवंशी यांनी हिंदुहृदसम्राट यांना अभिवादन केले. महिला सेना तालुका प्रमुख सुवर्णाताई रोकडे, नरेश चौथाईवाले,उपशहरप्रमुख राजु जाधव,चंद्रशेखरजी डांगे,प्रविण डांगे,जनार्धन भालेराव सर,सुनील देशमुख सर,दत्ता भाऊ शिंदे, अनिल चव्हाण, रूषभ पाटील, योगेश स्वामी, ब्रम्हा सारोळे, माधव स्वामी, सतीश जंगले, अजय पवार, विजय शिंदे, दीपक तोगरे,आजू शेख, दत्ता दासरवाड,शिवानंद डावरे, अभिजीत वाघमारे, आकाश शिंदे, सुमित बनसोडे, अनिल कच्छवे, श्याम वाघमारे, दिपक बानाटे, स्वप्निल भालके, दिपक कंचकटले,रोहित पवार, आकाश जाधव, 

श्रीकांत जायभाये, मंगेश जायभाये, महेश जायभाये, गंगाराम जायभाये, रावजी जायभाये, राम गायकवाड, हरिभाऊ सोडगिर,मनोज फड,निलकंठ जायभाये, सुधाकर जायभाये, शुभम जाधव, अजय पवार, अक्षय पवार, शुभंम जाधव, श्रीकांत पवार, शैलेश पवार, साईनाथ जाधव, अभिषेक पवार, किशोर जाधव, ज्ञानेश्वर जाधव, संदीप जाधव, सुरज जाधव, सोशल मीडिया तालुका प्रमुख सुलतान शेख, किनगाव विभाग प्रमुख(उपसरपंच दगदवाडी)लक्ष्मण गुट्टे व किनगाव शहर प्रमुख राजा खलील पठाण,असंख्य जनता,शिवसेना प्रेमी,बाळासाहेबांची शिवसेना शिवसैनिक उपस्थित होते.