दिंडोरी येथे विद्यालयाच्यावतीने मतदान जनजागृती...
![दिंडोरी येथे विद्यालयाच्यावतीने मतदान जनजागृती...](https://news15marathi.com/uploads/images/202403/image_750x_65fc284a2ebc6.jpg)
प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक
दिंडोरी शहरात आज गुरुवार दि.२० रोजी येथील जनता इंग्लिश स्कूल विद्यालयाच्यावतीने शासन आदेशानुसार नागरिकांमध्ये मतदान जगजागृती होण्यासाठी विद्यार्थ्यांनी मतदान जनजागृती मोहीम रॅली काढून नगरपंचायतीच्या पटांगणात पथनाट्य सादर केले.
त्यामध्ये नागरिकांनी मतदान करतांनी कुठल्याही प्रकारचा आळस न करता मतदानाला जाणे गरजेचे आहे. मतदार राजा जागा हो लोकशाहीचा धागा हो या ब्रीदवाक्यप्रमाने १८ वर्ष हे लग्न करायचे वय नसून मतदार नाव नोंदणी करायचे आहे.मतदान करताना ईव्हीएमचा वापर करावा मतदान हे सकाळी सात वाजेपासून सायंकाळी पाच वाजेपर्यंत असते म्हणून सर्वांनी मतदान करावे.तो आपला अधिकार आहे.देशाचे सरकार सक्षम,मजबूत व देशांचा विकास करणाऱ्या व्यक्तीलाच मतदान करावे,आपल्याकडे मतदानाची टक्केवारी अतिशय कमी असल्याने फक्त साठ टक्के लोक मतदान करतात व उर्वरित ४० टक्के लोक मतदान न करता मतदानाचा जो अधिकार आहे तो गमावून बसतात. शिवाय मतदारांनी कोणत्याही हवेश्या पोटी आपले मत विकू नये व आपले मत योग्य व्यक्तीला करावे जेणेकरून मतदार संघाचा,जिल्ह्याचा विकास होईल अशा व्यक्तीला मतदान करावे.अशा प्रकारचे मतदान हे लोकशाहीला योग्य असून लोकशाही पद्धतीने मतदान केल्याने देशाचा विकास हा होत असतो.
यावेळी आर्या पगारे,रिद्धी आवारे,गौरी पिंगळे,वैष्णवी वडजे,वेदश्री बोरस्ते,श्रुती वाघमोडे,अमृता कुलकर्णी,अक्षरा कदम,समृद्धी हिरे या विद्यार्थिनींनी मतदान जनजागृतीचे पथनाट्य सादर करून लोकांना मतदानाचे महत्त्व पटवून दिले. रॅलीमध्ये नगरपंचायत येथे नगरपंचायतीचे नगराध्यक्ष नगरसेवक कर्मचारी शिक्षक वृंद ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.