कोराटे येथील ग्रामपंचायत व शेतकऱ्यांना कृषी कन्यांची भेट...

कोराटे येथील ग्रामपंचायत व शेतकऱ्यांना कृषी कन्यांची भेट...

NEWS15 मराठी प्रतिनिधी - बापू चव्हान, नाशिक

दिंडोरी तालुक्यातील कोराटे येथे नाशिक येथील कर्मयोगी तुलाजी सिताराम पाटील कृषी महाविद्यालयातील कृषी कन्यांनी; नुकतीच कोराटे येथे ग्रामीण जागरूकता कार्यनुभव व कृषी औद्योगिक जोड कार्यक्रम २०२३-२४ अंतर्गत.! येथील ग्रामपंचायत शेतकऱ्यांना भेट देऊन विविध विषयांवर चर्चा व प्रात्यक्षिकाद्वारे शेतकऱ्यांना शेतीमधील नवीन तंत्रज्ञान, नवीन योजना, शेतकऱ्यांच्या पारंपारिक जीवनशैली आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने बदल कसा घडून येईल याविषयी माहिती देणार आहे.

या प्रकल्पासाठी प्राचार्य डॉ.बी.डी भाकरे, कार्यक्रम समन्वयक श्वेता सातपुते, कविता पानसरे आदींचे मार्गदर्शन लाभणार आहे.

यावेळी कृषी कन्या वेदिका घुगे, वैष्णवी भेगडे, साक्षी हांडगे, संपदा जाचक, दुर्गा जोंधळे, सृष्टी कदम, मृदुला केग आदींचा सरपंच अश्विनी दोडके, उपसरपंच बाळासाहेब कदम, सदस्य शरद बदादे, दिगंबर शिंदे, ग्रामपंचायतच्यावतीने व शेतकऱ्यांनी शाल श्रीफळ देऊन सत्कार केला.