कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 'द्वारका स्कूलचे' वर्ग 'ऑनलाईन'
जिल्हा प्रतींनिधी - विश्वनाथ केसवड ( खेड, पुणे ) कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व शाळांना सुट्टी दिली असली तरी काही शाळांनी ऑनलाईन साधनांचा वापर करून विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू ठेवले आहे. म्हाळुंगे इंगळे येथील द्वारका स्कूलने सुद्धा पहिली ते दहावीचे नियमित ऑनलाईन वर्ग सुरू केले असून विद्यार्थी व पालकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून शाळांना सुट्टी दिली आहे. विद्यार्थी व शिक्षकांनी घराबाहेर पडणे योग्य नाही. मात्र, घरी बसून काय करू? असा सवाल मुले पालकांना विचारत आहेत. परंतु द्वारका स्कूलने काही दिवसांपूर्वी ऑनलाईन वर्ग सुरू करून मुलांना काही तास गुंतून ठेवले आहे. त्यामुळे पालकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे. द्वारका स्कूलच्या मुख्याध्यापिका सौ. स्वाती आंब्रे म्हणाल्या, शाळेने ऑनलाईन वर्ग सुरू करण्यासाठी सॉफ्टवेअरचा वापर केला आहे. या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून पालक व विद्यार्थी संवाद साधून आम्ही शाळेचे नियमित वर्ग सुरू केले आहेत. त्यासाठी विद्यार्थ्यांना लॉगइन आयडी व पासवर्ड दिला आहे. सध्या विज्ञान, गणित, इंग्रजी, मराठी, हिंदी, इतिहास, आदी विषयाचे वर्ग घेतले जातात. तसेच मुलांना कंटाळा येऊ नये यासाठी संगीत, पेंटिग, नृत्य, शारीरिक शिक्षण आदीचे वर्ग ही होतात. लॉकडाऊन कधी संपणार हे माहीत नसल्याने विद्यार्थ्यांच्या विविध विषयाच्या परीक्षाही ऑनलाईन पद्धतीने घेतल्या जात आहेत. पालकांचे याबद्दल विचार - लॉकडाऊनच्या कालावधीत शाळांना सुट्टी असल्यामुळे घरात बसून मुले कंटाळली होती. त्यामुळे द्वारका स्कूलने सुरू केलेल्या ऑनलाईन वर्गामुळे मुले काही तास गुंतून राहतात. व मुलांचे 5 नुकसान होत नाही. त्यामुळे पालक समाधानी आहेत. - अखिल शेख, पालक द्वारका स्कूल