चाकणच्या डॉ. ऐश्वर्या जाधव पुणे मिसेस 2022

News15 प्रतिनिधी विश्वनाथ केसवड

चाकण : पुण्यामध्ये झालेल्या पुणे फेस्टिवल मधील विशेष पुणे 2022 या सौंदर्य स्पर्धेत चाकण स्थित डॉक्टर ऐश्वर्या गायधनी जाधव यांनी द्वितीय उपविजेतेपद पटकावले.

डॉक्टर ऐश्वर्या मनीष जाधव या दंतवैद्यकीय पदवीधर असून चाकणमध्ये त्यांचा दवाखाना आहे डॉक्टर डी वाय पाटील दंत महाविद्यालयात त्या ओरल अँड मॅक्सिलोफेशियल पॅथॉलॉजी या विषयात उच्च पदवीचे शिक्षण घेत आहे.

पुणे शहराचे माजी खासदार पुणे फेस्टिवलचे प्रणेते सुरेश भाई कलमाडी यांनी स्पर्धेचे उद्घाटन केले अमृता जगधने या स्पर्धेच्या आयोजका तथा सर्वेसर्वा होत्या. मिसेस पुणे स्पर्धेचे हे ३४ वर्ष होते. इंट्रोडक्शन, डान्स आणि वॉल्क व टॅलेंट असे स्पर्धेचे चार राउंड होते. एच आर ए राऊंडमध्ये विजेता व उपविजेता यामध्ये फार कमी पॉईंटचा फरक होता. या स्पर्धेतील उपविजेतेपदामुळे डॉक्टर ऐश्वर्या यांची चिकाटी अधोरेखित झाली चाकणच्या महिला सर्व क्षेत्रात अग्रेसर आहेत ही गोष्ट यावेळी स्पष्ट झाली. डॉक्टर ऐश्वर्या जाधव यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.