जानोरी येथे जिवंत देखावे पाहण्यासाठी गणेश भक्तांची अलोट गर्दी
![जानोरी येथे जिवंत देखावे पाहण्यासाठी गणेश भक्तांची अलोट गर्दी](https://news15marathi.com/uploads/images/202409/image_750x_66e584a83d86b.jpg)
प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक
दिंडोरी तालुक्यातील जानोरी येथे गेल्या अनेक वर्षा पासून गावात जीवांत देखावे दाखवण्याची परंपरा आजही ही चालू आहे.मात्र कोरोना काळात ही प्रथा बंद पडली होती. त्यामुळे गणेश भक्तांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात येत होती.मात्र २०२१ नंतर नवतरुणांनी पुन्हा एकत्र येऊन आपली कला दाखवण्यासाठी सुरवात केल्याने पुन्हा जिवंत देखावे दाखवण्याची परंपरा पुन्हा सुरु झाल्याने गावातील व परिसरातील गणेश भक्तांनी आनंद व्यक्त केला आहे.
जानोरी हे गाव बारा ते पंधरा हजार लोकसंख्येचे असून या गावात अनेक प्रकारचे उत्सव साजरे केले जातात यामध्ये बोहडा व गणेश उत्सव हे दोन उत्सव अतिशय मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात.जानोरी गावात दरवर्षी लहान-मोठे दहा ते पंधरा गणेश मंडळ असून हे गणेश मंडळ दरवर्षी पोलीस परवानगी व ग्रामपंचायत परवानगी घेऊन आप आपल्या परिसरांमध्ये गणरायाची स्थापना करून या उत्सवात प्रत्येक मंडळ दररोज रात्री वेगवेगळे जिवंत देखावे दाखवतात. त्यामध्ये ऐतिहासिक, संस्कृती, शैक्षणिक, स्वच्छता अभियान, शेतकऱ्यावर, राजकारण समाजकारण अशा अनेक विषयावर दररोज वेगवेगळे जिवंत देखावे दाखवतात. त्यामुळे हे जिवंत देखावे पाहण्यासाठी गाव परिसरातील अनेक गणेश भक्तगण व विविध क्षेत्रातील मान्यवर हे जिवंत देखावे पाहण्यासाठी रात्री येत असतात त्यामुळे जत्रेचे स्वरूप प्राप्त होते.