माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रतिमेला; भाजप युवामोर्चातर्फे जोडेमारो आंदोलन...
![माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रतिमेला; भाजप युवामोर्चातर्फे जोडेमारो आंदोलन...](https://news15marathi.com/uploads/images/202309/image_750x_650013fe4f36a.jpg)
NEWS15 मराठी प्रतिनिधी - असलम शेख, लातूर
शिवसेना (ठाकरे गट) पक्ष प्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी; जळगावं येथील सभेत सत्ताधारी नेत्यांवर आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. तर रंग रुपावरून देखील टोमणे मारल्याने, याघटनेनंतर भाजप कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आहेत. राजकारणात राजकारण हे विचारांनी लढले जाते; कोणाच्या रंग-रूपावरुन नाही असा संताप कार्यकर्ते व्यक्त करत आहेत.
त्यामुळं संतापलेल्या भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी; लातूर येथील गांधी चौकात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रतिमेला जोडे मारून आंदोलन केले आहे. तसेच यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांचे देखील नामकरण केले असून.! सुका व वाळलेले भोपळे फोडून उद्धव ठाकरे यांना सुका / वाळका भोपळा ही उपाधी दिली.
त्यामुळं राज्यात आता अशा डिवचणाऱ्या टोपण नावावरून राजकारण तपण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर भाजपच्या या कृतीला शिवसेना (ठाकरे गट) काय प्रतिक्रिया देते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.