इंदोरे ग्रामपंचायत सरपंचपदी रोहिणी गवळी...

इंदोरे ग्रामपंचायत सरपंचपदी रोहिणी गवळी...

प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक

दिंडोरी तालुक्यातील इंदोरे ग्रामपंचायत सरपंचपदी रोहिणी लक्ष्मण गवळी यांची बिनविरोध निवड झाली आहे. तत्कालीन सरपंच वर्षा कोरडे यांनी राजीनामा दिल्या नंतर; ही जागा रिक्त होती.

या जागेसाठी रोहिणी गवळी यांचा सरपंच पदासाठी एकमेव अर्ज आल्याने, निवडणूक निर्णय अधिकारी पांडुरंग बडे यांनी रोहिणी गवळी यांची सरपंचपदी निवड झाल्याचे घोषित केले.

यावेळी सरपंच रोहिणी गवळी यांचा ग्रामपंचायतीच्यावतीने सत्कार करण्यात आला. गवळी यांनी सांगितले की, गावाच्या विकासासाठी आपण सर्वांना बरोबर घेऊन काम करू व शासनाच्या विविध योजनांचा गावासाठी उपयोग करून विकास साधू असे सांगितले. याप्रसंगी मा. सरपंच रेखा धात्रक, ग्रामपंचायत सदस्य शिवाजी दरगोडे, मच्छिद्र बेडकुळे, वर्षा  कोरडे, पोलीस पाटील नाना लोखंडे, माजी सरपंच प्रभाकर धात्रक, सोसायटी चेअरमन निवृत्ती केदार, बाळू लोखंडे, ज्ञानेश्वर गवळी, योगेश धात्रक, धनंजय कोरडे, सविता कोरडे, कुसुम कोरडे आदी उपस्थित होते.