कर्मवीर राजाराम सखाराम वाघ जिल्हास्तरीय वकृत्व स्पर्धेचे १२ रोजी कादवा येथे आयोजन...
प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक
दिंडोरी तालुक्यातील कादवा सहकारी साखर कारखाना येथील कर्मवीर राजाराम सखाराम वाघ शैक्षणिक व आरोग्य संस्थेच्यावतीने; याही वर्षी कर्मवीर रा.स.वाघ नाशिक जिल्हा स्तरीय वकृत्व स्पर्धेचे गुरुवार दि. १२ सप्टेंबर रोजी आयोजन करण्यात आल्याची माहिती.! संस्थेचे अध्यक्ष शहाजी दादा सोमवंशी उपाध्यक्ष सुभाष शिंदे व सचिव बाळासाहेब उगले यांनी दिली आहे.
स्पर्धेबाबत अधिक माहिती आशि की जिल्हास्तरीय वकृत्व स्पर्धा ही बी.के. कावळे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय राजाराम नगर कादवा कारखाना येथे स्पर्धा चार गटात होणार आहे. गट क्रमांक - एक (इयत्ता पहिली ते चौथी) हा असून, या स्पर्धेसाठी कर्मवीर रा.स. वाघ, श्रीराम शेटे जीवनातील आजी-आजोबांचे स्थान, शिवरायांच्या जीवनातील एक प्रसंग मला ऑफलाईन आई हवी, माझे वडील गट क्रमांक दोन (इयत्ता पाचवी ते सातवी ) हा असून, विषय कर्मवीर रास वाघ एक समर्पित व्यक्तिमत्व श्रीराम शेटे एक जीवन व्रती, हरवत चाललेले बालपण, स्वराज्य जननी जिजाऊ, ग्लोबल वार्मिंग, संत अवतार होती याच साठी हे विषय आहे. गट क्रमांक तीन (आठवी ते दहावी )असून यासाठी कर्मवीर रास वाघ दूरदृष्टीचे नेते , लोकनेते श्रीरामजी शेटे, गुरुचे जीवनातील स्थान, छत्रपती शिवाजी महाराज मॅनेजमेंट गुरु, भारताचे ऑलिम्पिक मधील स्थान, मोबाईल मुळे कुटुंबातील संवाद हरवत चाललाय काय हे विषय आहे. गट क्रमांक चार (इयत्ता अकरावी व बारावी) यांच्यासाठी असून त्यांना विषय कर्मवीर रा.स.वाघ एक नेता, लोकनेते श्रीराम शेटे व कादवा परिसर,आधुनिक कृषी तंत्रज्ञान शेतीला तारक की मारक,युगप्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज,आरक्षण सद्यस्थिती व अपेक्षा , रील्स स्वयरा चार आमंत्रण देता येत का असे विषय असून चारही गटांसाठी विजेत्यांना रोख बक्षीस सन्मानचिन्ह सन्मानपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.
स्पर्धेचे आयोजन संस्थेच्यावतीने बी.के.कावळे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय राजाराम नगर यांना आयोजक म्हणून करणार आहे. नाशिक जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांनी जास्तीत जास्त स्पर्धक पाठवून या स्पर्धेत सहभाग घ्यावा असे आवाहन आयोजक म्हणून प्राचार्य बीके शेवाळे, पर्यवेक्षक व्ही. जे. जाधव, कॉलेज विभाग प्रमुख बाळासाहेब वडजे यांनी केले आहे. तर संयोजक म्हणून स्पर्धा विभागप्रमुख म्हणून सुरेश सलादे,प्रदीप नवले,सुरेश भुसाळ नियोजन करीत आहे.