लोहिया विद्यालयात लोकमान्य टिळक जयंती साजरी...

लोहिया विद्यालयात लोकमान्य टिळक जयंती साजरी...

प्रतिनिधी - सुधीर शिवणकर, गोंदिया

सौंदड : येथील लोहिया शिक्षण संस्था द्वारा संचालित रामेश्वरदास जमनादास लोहिया माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,जमुनादेवी लोहिया प्राथमिक शाळा,सौंदड यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 23जुलाई 2024 रोज मंगळवारला विद्यालयात  लोहिया शिक्षण संस्थेचे संस्थापक - संस्थाध्यक्ष मा. जगदीश लोहिया यांच्या प्रेरणेने विद्यालयात लोकमान्य टिळक जयंती साजरी करण्यात आली.

तसेच शिक्षण सप्ताह अंतर्गत विद्यार्थी आणि शिक्षक यांनी 'निपुण'' शपथ घेतली. यावेळी मा.उमा बाच्छल प्राचार्या, मा.डी.एस. टेभूर्णे पर्यंवेक्षक, प्राध्यापक आर. एन. अग्रवाल, प्राध्यापक जी. एस. कावळे यांनी प्रतिमेचे पूजन केले.

याप्रसंगी कु. गुणश्री बेंदवार या विद्यार्थिनीने लोकमान्य टिळकां विषयी माहिती सांगितली.

यावेळी विद्यालयातील शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स . शिक्षिका कू.यू.बी. डोये यांनी केले तर आभार स. शिक्षक. आर. आर. मोहतुरे यांनी मानले.