विद्युत कर्मचारी पगारवाढीच्या विषयांवर मंत्रालय मुंबई येथे बैठक.!

विद्युत कर्मचारी पगारवाढीच्या विषयांवर मंत्रालय मुंबई येथे बैठक.!

प्रतिनिधी - असलम शेख, लातूर

गुरुवार वार दि.०४ जुलै २०२४  रोजी मा.मुख्य सचिव महाराष्ट्र शासन यांच्या पातळीवर व  मा.अप्पर ऊर्जा सचिव तथा अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सुत्रधारी कंपनी, यांच्यासह तिन्हींही वीज कंपनीचे मा.अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांच्या उपस्थितीत मंत्रालय मुंबई येथे पगारवाढीच्या विषयांवर बैठक आयोजित करण्यात आली होती.या बैठकीस तिन्ही वीज कंपन्यांचे  मानव संसाधन विभागांचे सर्व संचालक, वित्त विभागाचे संचालक यांच्यासह तिन्ही कंपनीचे मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी उपस्थित होते.

यावेळी महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेसह उपस्थित कृती समितीतील संघटनांनी व्यवस्थापनासमोर पगारवाढीबाबत असलेली आपली भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट केली. संघटनेच्या वतीने १५%,२०%,२२.५%, २५%,व ३०% एवढी वाढ मूळ वेतनात केल्यास त्याचे किती बर्डन येईल याची सविस्तर माहिती व आकडेवारी सादर केल्यानंतर मा. मुख्य सचिव महोदयांनी संघटनेच्या प्रस्तावावर योग्य ती कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन दिले. महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेचा प्रमुख सहभाग असलेल्या वीज कर्मचारी अधिकारी अभियंता कृती समितीच्यावतीने पगारवाढीच्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहण्याची अपेक्षा व्यक्त करताना; येत्या चार दिवसांत वीज कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात २० ते २२.५ % एवढी वाढ करुन वीज कंपनीच्या कर्मचारी व अधिकारी, कर्मचारी यांना दिलासा द्यावा अन्यथा दि. ९ जुलै २०२४ रोजी कृती समितीचा घोषित राज्यव्यापी संप अटळ राहील. तेव्हा मा. मुख्य सचिव महोदयांनी तातडीने मा. ऊर्जा मंत्री यांच्याशी चर्चा करून सन्माननीय तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले व संपाची नोटीस मागे घेण्याची विनंती केली.

चर्चेअंती मा. मुख्य  सचिव यांनी त्यासंबंधी योग्य ती कार्यवाही करण्यासाठी संघटनांची भूमिका पुन्हा एकदा मा. ऊर्जामंत्री महोदय यांच्यापुढे सादर करणार असल्याचे आश्वासन दिले.

आज आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत  पगारवाढीबाबत योग्य ती सकारात्मक चर्चा  होऊन त्यावर कुठलाही अंतिम निर्णय झाला नसल्याने संंघटनेचे केंद्रीय पदाधिकारी व परिमंडळ शाखा पदाधिकारी तसेच सर्व विजनिर्मिती केंद्र शाखांच्या पदाधिकार्यांनी संपाची जय्यत तयारी करावी असे आवाहन केंद्रीय कार्यकारिणीच्या वतीने करण्यात येत आहे.

सबब या पार्श्वभूमीवर मा.ऊर्जा मंत्री महोदय यांच्या पातळीवर पुढील बैठक आयोजित करून चर्चा होईपर्यंत कृती समितीकडून घोषित नियोजित क्रमबद्ध आंदोलन सुरूच राहील,याची संघटनेच्या सर्व सभासदांनी कृपया नोंद घ्यावी.

या बैठकीत संंघटनेच्यावतीने अध्यक्ष मा. संजय घोडके, सरचिटणीस प्रेमानंद मौर्य, कार्याध्यक्ष मा. संजय मोरे, मुख्य संघटक मा. सुर्यकांत जनबंधू, उपसरचिटणीस मा. किशोर अहिवळे व मा. अश्वजित गायकवाड, मुख्य कार्यालय प्रकाशगड शाखा पदाधिकारी मा. ईश्वर भारती, मा. रमेश कावळे आदी मुख्य कार्यालय प्रकाशगड शाखा पदाधिकारी व रोहन मुडशिंगीकर, अनुप लोखंडे हे  उपस्थित होते. असे बालाजी कांबळे लातूर परिमंडळ कार्याध्यक्ष यांनी सांगितले.