वाकी बुद्रुक गावात वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न...
![वाकी बुद्रुक गावात वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न...](https://news15marathi.com/uploads/images/202307/image_750x_64aa62fc9c709.jpg)
News15 प्रतिनिधी - विश्वनाथ केसवड
खेड : मुक्ताई फाउंडेशनचे डायरेक्टर आणि वाकी गावचे सुपुत्र डॉ. दादासाहेब गारगोटे यांच्या सौजन्याने; वाकी बुद्रुक गावात वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न झाला. फळझाडे जास्तीत जास्त लावण्याचा तरुणांचा संकल्प आहे. झाडे जगावे म्हणून त्यासाठी जाळीची सुद्धा व्यवस्था केलेली आहे.
प्रदूषणाच्या काळात वृक्षांची गरज ओळखून, डॉक्टर साहेब व त्यांच्या सहकाऱ्यांनी वृक्षारोपणाचा कार्यक्रम हातात घेतला. या कार्यक्रमासाठी मोफत जेसीबी युवा उद्योजक रमेश दादा टोपे व गौरव टोपे यांनी उपलब्ध करून दिले. पिरसाहेब मित्र मंडळाचे अध्यक्ष व त्यांचे सर्व सहकारी यावेळी उपस्थित होते. यावेळी चेअरमन सोमनाथ टोपे यांनी वृक्ष संवर्धनाची शपथ सर्वांना दिली. यावेळी बाजार समितीचे संचालक विनोद टोपे, धनंजय कड, विश्वास टोपे, गौरव टोपे, गणेश टोपे, सुदाम गारगोटे, किरण दादा जाधव, ओंकार टोपे, खंडू लक्ष्मण टोपे, प्रदीप टोपे, किरण दादा टोपे, विशाल जरे, शांताराम टोपे, संतोष टोपे, सुरेश टोपे, महादू टोपे तसेच ग्रामस्थ वाकी गावचे कृषी सहाय्यक, तलाठी उपस्थित होते.