निवडणूक खर्च निरीक्षक श्रीमती गायत्री यांची दिंडोरीला भेट व पाहणी...

निवडणूक खर्च निरीक्षक श्रीमती गायत्री यांची दिंडोरीला भेट व पाहणी...

प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक

सार्वत्रिक विधानसभा निवडणूकीचे महाराष्ट राज्यात  कामकाज सुरू असून आज निवडणूक खर्च निरीक्षक श्रीमती गायत्री यांनी निवडणूक निर्णय अधिकारी 122 दिंडोरी (अ.ज.) विधानसभा मतदारसंघ तथा उपविभागीय अधिकारी कार्यालयामध्ये निवडणूक खर्च बाबत  निवडणुकीसाठी नियुक्ती खर्च पथकातील,तसेच क्षेत्रीय स्तरावरील विविध पथकातील पथकातील अधिकारी कर्मचारी, सहाय्यक निवडणूक निरीक्षक खर्च, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांची निवडणूक खर्चाबाबत आढावा बैठक घेतली. सदर बैठकीमध्ये नामनिर्देशन पत्र दाखल झाल्यापासून  उमेदवारांच्या खर्चाबाबत माहिती प्राप्त करून घेण्याबाबत सूचित केले.  उमेदवारांचा दैनंदिन खर्च विहित नमुन्यात देण्यात आलेल्या रजिस्टरमध्ये वेळेत सादर होईल याबाबत  दक्षता  घ्यावी असे सांगितले. प्रचार सभा, रॅली, कॉर्नर सभा, निवडणुकीचे प्रचार होताना  विविध पथकांनी भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे काटेकोरपणे कार्यवाही करावी. अवैध रोकड, दारू, साड्या, फेटे यांचे वाटप होत असल्याबाबत काही तक्रारी प्राप्त झाल्यास तात्काळ कारवाई करण्याबाबत निर्देशित केले. 

आंतरराज्य व आंतरजिल्हा सीमेवर जादाची गस्त घालून पोलीस विभाग, अबकारी विभाग, महसूल विभाग व स्थानिक अधिकारी कर्मचारी यांनी जास्तीत जास्त तपासणी करून परिणामकारकरीत्या कारवाई करण्याबाबत निर्देशित केले.

यावेळी निवडणूक खर्च निरीक्षक  यांनी वणी व ढकांबे येथील स्थिर सर्वेक्षण पथकालाही भेट दिली व त्या ठिकाणी सुरू असलेल्या कार्यवाही बाबत माहिती घेऊन काही मौलिक सूचना व मार्गदर्शन केले.

यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी आप्पासाहेब शिंदे,साहाय्यक निवडणूक अधिकारी आशा गांगुर्डे,तहसीलदार मुकेश कांबळे आदी उपस्थित होते.खर्च निरीक्षक श्रीमती गायत्री यांचे निवडणूक निर्णय अधिकारी आप्पासाहेब शिंदे यांनी गुच्छ देऊन स्वागत केले.