पतीसमोरच पत्नीवर लैंगिक अत्याचार, पैसे परत न केल्यानं खाजगी सावकाराचं कृत्य.! आरोपीकडून व्हिडीओ व्हायरल...
NEWS15 रिपोर्ट - पुणे
गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी आणि महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असून, अशीच एक धक्कादायक घटना शिक्षणाच्या माहेर घरातून म्हणजेच पुण्यातून समोर आली आहे. तर संस्कार/संस्कृति आणि विद्येचे माहेर घरात अशी घटना घडल्याने नगरिकांमधून रोष व्यक्त केला जात आहे. उसने घेतलेले पैसे परत न दिल्याने एका नराधम खाजगी सावकाराने पैसे घेतलेल्या व्यक्तीच्या पत्नीवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. एवढंच नव्हे तर या संपूर्ण प्रकाराचा व्हिडीओ तयार करुन हा व्हिडीओ आरोपीने सोशल मीडियावर व्हायरल केला असल्याचे देखील म्हंटले जात आहे.
पुण्यातील हडपसर परिसरात फेब्रुवारी 2023 मध्ये ही घटना घडली. 34 वर्षीय विवाहित महिलेने या प्रकरणी तक्रार दिली आहे. त्यानुसार आरोपी इम्तियाज हसीन शेख वय - 47 वर्षे याच्याविरोधात हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, त्याला अटक करण्यात आली आहे. तब्बल 6 महिन्यांनी हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. हडपसर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.
पीडित महिलेच्या पतीला आरोपीला इम्तियाज हसीन शेख याने उसने पैसे दिले होते. उसने घेतलेले पैसे फिर्यादीचा पती परत करू शकला नाही. त्यामुळे आरोपीने फिर्यादी आणि तिच्या पतीला ठार मारण्याची धमकी देत हडपसर येथील म्हाडा कॉलनीत बोलावून घेतले. त्यानंतर फिर्यादीच्या पतीला समोर बसून चाकूचा धाक दाखवत ठार मारण्याची धमकी दिली. त्यानंतर आरोपीने त्याच्या पत्नीसोबत जबरदस्तीने शारिरीक संबंध ठेवले.
धक्कादायक बाब म्हणजे या संपूर्ण घटनेचा आरोपीने मोबाईलमध्ये व्हिडिओ देखील तयार केला होता. त्यानंतर पुन्हा आरोपीने फिर्यादी महिलेकडे शरीर संबंधाची मागणी केली. मात्र फिर्यादीने त्यास नकार दिला. पीडितेच्या तक्रारीनंतर आरोपी इम्तियाज हसीन शेख याने हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करुन टाकले. दरम्यान हा प्रकार समजताच पीडितेने तात्काळ हडपसर पोलीस ठाणे गाठले आपली तक्रार नोंदवली. तक्रार दाखल होताच हडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके या संपूर्ण प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
